ऑनलाईन सातबाराला आता डाऊनलोडिंगचा पर्याय !

विकास गाढवे 
गुरुवार, 12 जुलै 2018

लातूर : सर्व्हर डाऊनसह विविध कारणांमुळे मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन सातबारा तांत्रिक कचाट्यात सापडला आहे. यातच सातबाराचे महाभूलेख संकेतस्थळ ऐन हंगामात बंद पडल्याने शेतकऱ्यांसह तलाठ्यांची गोची झाली. दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन सातबारा सुरू झाला तरी त्याची गती मंद आहे. यावर सरकारने सातबाराचे पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करून त्याची तलाठ्यांकडून प्रिंट काढून देण्याचा उपाय शोधला आहे. यातूनच गुरूवारी (ता. 12) सकाळपासून सातबारांचे डाऊनलोडींग सुरू झाले असून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील 922 पैकी 80 गावांचे सातबारा डाऊनलोड झाले होते.

सातबारा आणि आठ अ सोबत फेरफारासाठी शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी सरकारने महाभूलेख हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावरून ऑनलाईन सातबारा आणि आठ अची प्रिंट काढता येत आहे. यासोबत याच संकेतस्थळावरून फेरफाराचीही प्रक्रिया करण्याचे नियोजन सुरू आहे. काही वर्षापासून सातबाराच्या ऑनलाईनचे हे प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात त्याला यश आलेले नाही. यातूनच डिजीटल सातबाराची संकल्पना मागे पडले आहे.

संकेतस्थळाचे सर्व्हर डाऊन झाल्याने ऑनलाईन सातबारासह फेरफाराला अडचणी येत असून मागील काही महिन्यांपासून शेतकरी व तलाठी कर्मचारी त्रस्त आहेत. सध्या पिकविमा आणि पिककर्जासाठी सातबारा व अन्य कागदपत्रांची गरज असताना सर्व्हर डाऊन झाले आणि तब्बल बारा दिवस संकेतस्थळ बंद पडले. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. तलाठ्यांचीही अडचण झाल्याने त्यांना गावात जाणे मुश्किल होऊन बसले. यातच बंद पडलेले संकेतस्थळ मंगळवारी (ता. दहा) दुपारी सुरू झाले. मात्र, त्यावरून सातबारा ओपन होण्यासाठी तासन् तास लागू लागला.

एकाचवेळी ताण आल्याने संकेतस्थळाची गती मंदावली. यातूनच दोन दिवसात काहीच मार्ग निघत नव्हता. गुरूवारी जमाबंदी आयुक्त कार्यालयाने यावर मार्ग काढला असून पिकविमा आणि पिककर्जासाठीच्या काळातील वेळ कशीबशी मारून नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

डाऊनलोड सातबारा देणार

गतीमंद ऑनलाईन सातबाराचे पीडीएफ फॉर्मेटमध्ये डाऊनलोड करून तो तलाठी कर्मचाऱ्यांना फाईलच्या स्वरूपात देण्यात येत आहे. त्याची प्रिंट काढून तलाठी शेतकऱ्यांना देऊ शकणार आहेत. गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून माधव मलिशे यांनी दिवसभरात ऐंशी गावांचे सातबारा डाऊनलोड करून पीडीएफमध्ये तलाठ्यांना दिले.

सातबारा डाऊनलोड करण्याचे प्रक्रियेबद्दलही या तलाठ्यांना सांगून त्यांच्या तालुक्यातील तलाठ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. यामुळे दोन दिवसात सातबाराचे वितरण पुर्ववत होण्याची आशा मलिशे यांनी व्यक्त केली. 

Web Title: Online Property paper is now the downloading option