संशोधनात्‍मक लेखणातील वाङ्‍मयचौर्य  रोखण्‍याची गरज : कुलगुरू डॉ. अशोक ढवण

file photo
file photo

परभणी : कृषी विद्यापीठाचे मानांकन उंचाविण्‍यासाठी जागतिक स्‍तरावर संशोधनात्‍मक लेख प्रसिद्ध होणे आवश्‍यक आहे. जागतिक स्‍तरावर कृषी विद्यापीठाचे संशोधन पोचवण्‍याकरिता संशोधन लेखणाचा दर्जा वाढविण्‍याची गरज आहे. सॉफ्टवेअरच्‍या माध्‍यमातून संशोधन लेखणातील वाङ्‍मयचौर्य रोखण्‍यासाठी विद्यापीठाने स्‍वतंत्र धोरण निश्चित केले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यापीठ ग्रंथालय व विस्‍तार शिक्षण विभागाच्‍या वतीने ता. २० ते २४ मे दरम्‍यान, संशोधनात्‍मक लिखाणावर ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले. या प्रशिक्षणाच्‍या उद्‍घाटन प्रसंगी बुधवारी (ता. २०) ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणून शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्‍त्राचे विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र कुंभार, तसेच विस्‍तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कदम, विद्यापीठ ग्रंथपाल डॉ. संतोष कदम आदींनी ऑनलाइन सहभाग घेतला.
याप्रसंगी शिक्षण संचालक डॉ. गोखले यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींना संबोधित केले. तसेच डॉ. कुंभार यांनी ‘संशोधन लेखनातील वाङ्‍मयचौर्य एक आव्‍हान’ यावर मार्गदर्शन केले. प्रास्‍ताविक डॉ. संतोष कदम यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रवीण कापसे यांनी केले, तर आभार डॉ. राजेश कदम यांनी मानले.
प्रशिक्षण कार्यक्रमात कर्नाटक, उत्तर प्रदेश व राज्‍यातून विविध विद्यापीठांतील चारशेपेक्षा जास्‍त संशोधक, पदव्‍युत्तर विद्यार्थी व प्राध्‍यापकांनी सहभाग नोंदविला. प्रशिक्षण आयोजन समितीत डॉ. राजेश कदम, डॉ. संतोष कदम, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. रणजित चव्‍हाण, प्रा. रवी शिंदे, संतोष ढगे, डॉ. वंदना जाधव, भगवान कांबळे, मोहन झोरे आदींचा समावेश आहे.

विविध विषयांवर मार्गदर्शन
या प्रशिक्षणात दर्जेदार प्रकाशनात ‘नैतिक पैलू’ यावर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील डॉ. डी. के. वीर, ‘वाङ्‍मयचौर्य एक समस्‍या’ यावर वनामकृविचे माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, ‘उरकुंट अंटी प्‍लाजेरिझम सॉफ्टवेअर’ याबाबत पुणे येथील प्रशिक्षक प्रीती राठी, ‘संशोधन मेट्रिक्स’वर गुलबर्गा विद्यापीठातील डॉ. सुरेश जंगे, ‘लिखाणाचे अवतरण’ यावर गोवा विद्यापीठाचे डॉ. गोपा कुमार यांचे मार्गदर्शन होणार आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com