‘या’ जिल्ह्यात वृक्षलावगडीचे पितळ उघडे 

Nanded News
Nanded News

नांदेड :  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनस्तरावरुन वृक्षलावड अभियान राबवण्यात आले. यंदाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत सामजिक वनिकरण विभागातर्फे रस्ता, कालवा दुतर्फा, गायरान जमिनीवर वृक्षलागवड केली.  खड्ड्यांसह वृक्षलावडीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर रस्त्याच्या कडेला रोपवाटीकेतून आणलेली रोपे पिशवीसहीत फेकण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे. रस्ता दुतार्फावर केलेली वृक्षलागवडीस शास्त्रीय प्रक्रीयेला बगल देत केवळ निधी हडप करण्यासाठीच हे अभियान आहे का? अशा चर्चा आता नागरिकांमधून समोर येत आहेत. 
 
वनक्षेत्रात वाढ करुन जैवविविधता राखण्यासाठी शासनस्तरावरुन ५० कोटी वृक्षलागवडीसाठी पंचवार्षीक आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार २०१४ ते २००९ या कार्यकाळात टप्या टप्याने राज्यभरात वृक्षलागवड करण्यात आली. शासकिय, निमशासकिय, समाजिक संस्थांच्या पुढाकाराने जिल्ह्यात हे उद्दिष्ट शास्त्रीयपद्धत झुगारून पूर्ण करण्यात आले. वास्तविक पाहता वृक्षलावगडीचा उद्देश साध्य करण्यासाठी जिल्हास्तरावर वनविभाग, सामाजिक वनिकरण विभागाकडे रोपांच्या पुरवठ्यापासून शास्त्रीय पद्धतीने वृक्षलागवडीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. 

खड्ड्यांचा फक्त सोपस्कार
वृक्षलागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी दरवर्षी मार्चनंतर खड्डे खोदण्यासाठी शासनस्तरावरुन निधीची तरतुद करण्यात आली होती. जमीनीच्या प्रतवारीनुसार काळ्या, तांबट, मुरमाड जमीनीमध्ये जुनपर्यंत निकषानुसार खड्डे खोदण्यात आले. दरम्यान सुरवातीला मनरेगाअंतर्गत खड्डे खोदण्याच्या कामात बदल करुन यंत्रास मान्यता देण्यात आली. त्यानुसार सामाजीक वनिकरण विभागाने जिल्हाभरातील रस्त्यांच्या दुतर्फा खड्ड्यांचा सोपस्कार केला. 

शास्त्रीय पद्धतीला बगल
शास्त्रीय पद्धतीने वृक्षलागवडीसाठी रोपांच्या निवडीपासून खड्यांच्या लांबी-रुंदीसह खोलीचे निकस ठरवून दिलेले होते. पण वृक्षलागवडीचा केवळ सोपस्कार पार पाडून निधी हडप करण्याच्या उद्देशाने आमदुरा- देवापुर- माळकौठा मार्गाच्या बाजूने यंत्राऐवजी फावड्याने एक फुट व्यास व खोलीचे खड्डे खोदण्यात आले. शासन निर्देशानुसार जुलै महिन्यात वृक्षलावड अभियानास प्रारंभ होताच या मार्गावर वृक्षलागवडीसाठी रोपवाटीकेतून आणलेल्या वृक्षरोपांचे ढिग रचन्यात आले. पावसाने उघडीप दिल्याचे कारण पुढे सारत सामाजिक वनिकरण विभागाच्या यंत्रणा तब्बल दिड महिना इकडे फिरकलीच नाही. 

रोपे पिशव्यांसहित फेकले
वृक्षरोपांच्या देखभालीसाठी कागदोपत्री मजुरांच्या नोंदी करुन बहूतांश खड्ड्यात पिशवीसहीत वृक्षरोपे अक्षरशः फेकण्यात आली. त्यामुळे वृक्षरोपे अवघ्या महिनाभरात जळून गेली. याशिवाय रोपवटीकांमध्ये दुष्काळात लाखो रुपये रोजगारावर जगवलेल्या रोपांचे रिचलेले ढिग पिशव्यासहीत फेकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नरसी- देगलूर या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरीकांना प्रकर्षाने दिसून येत आहे. 
 
वृक्षलागवडीचे अस्तित्व धोक्यात
सामाजीक वनिकरण विभागाचा वृक्षलागवड अभियानामध्ये राज्यात दुसरा क्रमांक आल्याचा डांगोरा पिटविण्यात येत असला तरी नांदेड, देगलूर परिक्षेत्राअंतर्गत रस्ता, कालवा दुतर्फा, गायराण जमिनीवर यंदाच्या ३३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीचे अस्तीत्व अवघ्या दिड महिण्यात चाळणीतून शोधण्याची वेळ आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com