esakal | राज्यपाल नियुक्त जागासाठींच्या यादीत बीडच्या रजनी पाटील; काँग्रेसकडून संधी
sakal

बोलून बातमी शोधा

rajni patil.jpg

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी मागच्या अनेक महिन्यांपासून खलबते सुरु होती. कोरोनाचा फैलाव, नियुक्तीसाठीचे निकष, महाविकास आघाडीतील वाटाघाटी असे अनेक मुद्दे यामध्ये होते. अखेर यावर शिक्कामोर्तब होऊन आघाडीतील तीनही पक्षांनी प्रत्येकी चार- चार जणांची शिफारस केली.

राज्यपाल नियुक्त जागासाठींच्या यादीत बीडच्या रजनी पाटील; काँग्रेसकडून संधी

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ जागांची यादी सरकारने शुक्रवारी (ता. सहा) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली. या यादीत काँग्रेसकडून ज्येष्ठ नेत्या आणि माजी खासदार रजनी पाटील यांचे नाव असल्याचे समजते.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी मागच्या अनेक महिन्यांपासून खलबते सुरु होती. कोरोनाचा फैलाव, नियुक्तीसाठीचे निकष, महाविकास आघाडीतील वाटाघाटी असे अनेक मुद्दे यामध्ये होते. अखेर यावर शिक्कामोर्तब होऊन आघाडीतील तीनही पक्षांनी प्रत्येकी चार- चार जणांची शिफारस केली. यामध्ये काँग्रेसकडून रजनी पाटील यांचे नाव आहे. रजनी पाटील काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या कायम निमंत्रीत सदस्या असून हिमाचल काँग्रेसच्या प्रभारी आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य, जिल्हा परिषदचे सदस्य, लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार, केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्षा, महाराष्ट्र खादी ग्राम मंडळाच्या जिल्हाध्यक्षा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरचे सचिवपद सांभाळले आहे. बीड जिल्ह्यात त्यांच्या माध्यमातून भाजपला लोकसभेतील पहिला विजय मिळविता आला होता. 

(संपादन-प्रताप अवचार)