Adul News : पारुंडी तांडा येथील स्मशानभुमीच्या कामाला वनविभागाची आडकाठी

ग्राम पंचायत पदाधिकारी व वनविभागाच्या कर्मचारयात जुंपली,ग्रामस्थ संतप्त
oppose of forest department to parundi tanda cemetery
oppose of forest department to parundi tanda cemeterySakal

आडुळ : स्वातंञ्याच्या पुर्वी पासुन ज्या ठिकाणी पुर्वजांवर अंत्यसंस्कार केले त्यांची थडगे बांधली त्याच जागेवर सर्व प्रकारच्या कागदपञांची पुर्तता करुन शासना कडुन नियमानुसार मंजुर झालेल्या बंजारा व मातंग समाजाच्या स्मशानभुमीच्या

कामाला वनविभागाने आडकाठी घालुन काम बंद केल्याने आपल्या कुुटुंबात कोणाचा मृत्यु झाला तर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावे कुठे असा प्रश्न पारुंडीतांडा ता. पैठण येथील बंजारा व मातंग समाजाला निर्माण झाला आहे.

पारुंडी तांडा हे जवळपास २५० उंबरठ्याचे गाव असुन येथे बंजारा समाजासह मातंग समाजाची घरे आहेत. येथील नागरीक आपल्या कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर वडिलोपार्जित पणे चालु असलेल्या रुढी व परंपरेनुसार पिढ्यांपिढ्या पासुन येथील वनविभागाच्या जंगलात स्मशानभुमीसाठी आरक्षित असलेल्या गट क्रमांक ३८ मधील बंजारा समाजासाठी ५ गुंठ्यात व मातंग समाजासाठी २ गुंठ्यात उत्तरकार्य करतात.

हि जागा महसुल विभागाच्या सातबारा व फेरफार नुसार दोन्ही समाजाच्या मालकीची आहे त्यामुळे येथील ग्राम पंचायतीने सदरील जागेवर दोन्ही समाजाच्या स्मशानभुमी साठीचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल केला होता.

कागदपञे योग्य असल्याने त्याची मंजुरी ही मिळाली त्यामुळे आठ दिवसांपुर्वी येथील ग्राम पंचायतीने सदरील जागेवर स्मशानभुमीच्या लोखंडी शेडचे काम चालु केले होते. या स्मशानभुमीच्या फॉन्डीशनसाठी आरसीसी कॉलमचे काम पुर्ण झाल्याची माहिती वनविभागाला कळताच त्यांनी सदरील जागा हि वनविभागाच्या मालकीची असल्याचे सांगुन स्मशानभुमीचे बांधकाम बंद पाडले.

काम बंद केले नाही तर गुन्हे दाखल करु असे सांगीतल्याने काही काळ संतप्त नागरीक व वन कर्मचारी यांच्यात वादावादी देखील झाली. येथील नागरीकांचे म्हणणे आहे कि ज्या ठिकाणी आमच्या पुर्वजांचे थडगे आहेत त्याच ठिकाणी आम्ही नियमानुसार बांधकाम करीत आहोत तर वनविभागाचे म्हणणे आहे

सदरील गटात दोन्ही समाजाची एकुण सात गुंठे जागा जरी असली तरी त्याची चतुर्सिमा नाही शिवाय वनविभागाच्या सक्षम अधिकारी यांच्या परवानगीचे पञ नाही त्यामुळे जो पर्यंत वरिष्ठांच्या आदेशाचे पञ ग्राम पंचायत आम्हाला देत नाही तो पर्यंत या जागेवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करु देणार नाही. त्यामुळे येथील नागरीकांना मेल्यानंतर तरी उत्तरकार्यासाठी हक्काची जागा मिळेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

येथील बंजारा समाजाच्या स्मशानभुमीसाठी जन सुविधा योजनेतुन ६ लाख तर मातंग समाजाच्या स्मशानभुमीसाठी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजने अंतर्गत १० लाखाचा निधी प्राप्त झाला आहे सदरील कामाचे वर्क ऑर्डर निघाल्याने सदरील दोन्ही काम ग्राम पंचायतीने चालु केले होते माञ सदरील काम वनविभागाने बंद पाडल्याने हा निधी परत जातो कि काय अशी भिती निर्माण झाली आहे.

ग्राम पंचायतीने नियमानुसार सदरील स्मशानभुमीचे काम चालु केले असुन वनविभागाने आडकाठी आणल्यास वनविभागाच्या कर्मचारया विरुध्द सरकारी कामात अडथळा म्हणुन ग्राम पंचायत गुन्हा दाखल करेल. हे बांधकाम आम्ही सर्व प्रकारच्या कागदपञांची पुर्तता करुनच सुरु केले आहे.

- अकाश राठोड (सरपंच पारुंडी तांडा)

ज्या ठिकाण स्मशानभुमीचे काम सुरु करण्यात आले आहे ते क्षेञ वनविभागाचे असुन ग्राम पंचायतील सदरील बांधकाम नियमबाह्य पध्दतीने सुरु केल्याने आम्ही ते बंद पाडले आहे.

-समीना शेख (वनरक्षक, पारुंडी बिट)

ग्राम पंचायतीने दिलेल्या कागदपञाची शहानिशा करण्यासाठी महसुल विभागाकडे पाठण्यात आले आहे त्यात कळेल कशाच्या आधारे हि जमीन स्मशानभुमीला देण्यात आली आहे त्यानंतर योग्य तो निणर्य घेण्यात येईल.

- दादासाहेब तौर (वनपरिक्षेञ अधिकारी, छञपती संभाजीनगर )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com