Bharat Sankalp Rath : मोदींच्या भारत संकल्प रथावर कापूस फेकून निषेध

रथाला विरोध करणारे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल
oppose to bharat sankalp rath of throwing cotton jalna viral video
oppose to bharat sankalp rath of throwing cotton jalna viral videoSakal

भोकरदन (जालना) : सध्या देशभर सरकार तर्फे भारत संकल्प रथ हा गावोगावी जाऊन भारत सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे .गावोगावी ह्या रथाला विरोध होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी या रथाला विरोध करणारे व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाले.

भोकरदन तालुक्यातील दानापुर या गावा त रविवारी हा रथ आला असता काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याला तीव्र विरोध केला सरकारी पैशातून मोदी स्वतःची जाहिरात करीत आहेत.असा आरोप युवक काँग्रेसचे जालना जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी केला

जालना जिल्हा युवक काँग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांनी दानापूर ता.भोकरदन येथे मोदींचा संकल्प रथ अडवला व त्याच्यावर कापूस फेकून निषेध व्यक्त केला. रथावरील मोदींचे नाव हटवून तिथे भारत सरकारच्या नावाचे स्टिकर देखील स्वतः लावले. मोदींनी दिलेले कुठलेही आश्वासन पूर्ण केलेले नाही.

उलट महागाई सर्वाधिक स्तरावर आहे.शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. कापसाला प्रति क्विंटल 12000 भाग द्यावा.सोयाबीनला प्रति क्विंटल 10000 भाव, द्यावा पिक विम्याची रक्कम तत्काळ वर्ग करावी, दुष्काळाची रक्कम तत्काळ वर्ग करावी,

प्रोत्साहन पर अनुदानाची रक्कम वर्ग करावी,घरकुल,विहिरी चे अनुदान वाटप करावे, मराठा आरक्षण,धनगर आरक्षण,मुस्लिम आरक्षण प्रश्न मार्गी लावावे,दूध दरवाढ करावी नंतर खुशाल रथ फिरवावा असे यावेळी देशमुख म्हणाले.

शेतकऱ्यांच्या समस्या जोपर्यंत सरकार सोडवत नाही,तोपर्यंत रथ फिरू देणार नाही.असा इशारा यावेळी देशमुख यांच्या तर्फे देण्यात आला.यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहुल देशमुख विधानसभा युवा काँग्रेसचे अध्यक्ष महेश दसपुते,उपाध्यक्ष जुनेद शेख,

राहुल शिंदे, अनिल शिंदे नाना भाऊ जाधव,संतोष ठाकरे,शुभम देशमुख, जहीर शेख,मोठेबा जाधव,रामेश्वर दळवी,अन्वर शेख,केशव दळवी,शागीर सय्यद,हारून पवार.आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com