esakal | खासगी रुग्णालय सुरु ठेवण्याचे आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

korona virus desease logo.jpg

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या निदर्शनास आल्याने सर्व खासगी रुग्णालय सुरु ठेवावेत व या रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित राहण्याचे सक्त आदेश त्यांनी दिले आहेत. 

खासगी रुग्णालय सुरु ठेवण्याचे आदेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी संचारबंदी लागू केल्यानंतर बऱ्याच खासगी रुग्णालयात सर्दी, खोकला व तापीच्या रुग्णांना प्रवेश देण्यात येत नाही. तसेच रुग्णालयात कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे जनतेला वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहावे, लागत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या निदर्शनास आल्याने सर्व खासगी रुग्णालय सुरु ठेवावेत व या रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित राहण्याचे सक्त आदेश त्यांनी दिले आहेत. 

प्रतिबंधात्मक उपाय योजना लागू
कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत. यानुसार मागील काही दिवसांत पुणे, मुंबई, हैदराबाद किंवा इतर महानगरांमधून नांदेडला आलेल्या नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाचे कर्मचारी करणार आहेत. ग्रामीण भागातही आलेल्या नागरिकांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी करणार आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा ता. १३ मार्चपासून लागू करून करून खंड दोन, तीन व चारमधील तरतुदीनुसार ता. १४ मार्चपासून अधिसूचना निर्गमित केली आहे. या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. 

हेही वाचा.....भाजीपाला विक्रेत्यांना विक्रीस्थळ द्यावेत

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातुन अंमलबजावणी 
या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांच्यासह इतर विभागप्रमुखांच्या माध्यमातून जिल्ह्यात उपाययोजना राबविण्यात येत आहेत. आजपर्यंत वेगवेगळे आदेश काढून उपाययोजना सुचविल्या आहेत.

हेही वाचलेच पाहिजे....अत्यावश्यक सेवांची वाहतूक चालू राहणार

सर्दी, खोकला व तापीच्या रुग्णांना प्रवेश नाकारला
खासगी रुग्णालयात सर्दी, खोकला व तापीच्या रुग्णांना प्रवेश देण्यात येत नाही. तसेच रुग्णालयात कर्मचारी उपस्थित राहत नसल्यामुळे जनतेला वैद्यकीय सुविधेपासून वंचित राहावे, लागत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या निदर्शनास आल्याने सर्व खासगी रुग्णालय सुरु ठेवावेत व या रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित राहण्याचे सक्त आदेश त्यांनी दिले आहेत. तसेच सर्वांना आवश्यक त्या वैद्यकीय सुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत. 

आदेशाचे पालन झाले नाही तर कारवाइ
या आदेशाचे कोणत्याही खासगी रुग्णालय आस्थापणेकडून उल्लंघन होवून वैद्यकीय सेवा पुरविण्यातस दिरंगाइ केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपायोजना नियम २०२० मधील तरतुद व आपत्ती व्यवस्थापना अधिनियम २००५ च्या कलम ५१ व इतर अनुषंगिक कायद्यानुसार कारवाइ करण्याचा इशारा दिला आहेह. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधीत आस्थापनाधारकांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. 
 

loading image