Vidhan Sabha 2019 : अर्ज मागे घ्या; बंडखोरांना पक्षाचा अल्टिमेटम

प्रकाश बनकर
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद जिल्ह्यात नऊ मतदारसंघ झालेले बंडखोरी रोखण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ बंडखोरांना थंड करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ मतदारसंघ झालेले बंडखोरी रोखण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ बंडखोरांना थंड करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे. व दोन्ही पक्षांच्या बैठकीत बंडखोरांना अर्ज मागे घेण्याची सांगण्यात आले आहे.अर्ज मागे न घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहे.

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीच्या माघारीमुळे प्रणिती शिंदेंना मोठा दिलासा

यात भाजप-शिवसेनेची सोमवारी संयुक्त बैठक झाली या बैठकीत खासदार चंद्रकांत खैरे आमदार संजय शिरसाट भाजपचे  प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड नंदकुमार घोडेले यांच्यासह  वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. भाजपतर्फे पैठण सिल्लोड कन्नड पश्चिम आणि मध्य पश्चिम मधील उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.

पैठण येथून कांचन चाटे, कल्याण गायकवाड कन्नड येथून संजय गव्हाणे, सिल्लोड येथून सुरेश बनकर ,सुनील मिरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याचे त्यांनी सांगितले या सन पूर्व मधून शिवसेना रेणुकादास वैद्य तसेच मध्य मधून किशनचंद तनवाणी हेही माघार घेतील, तनवाणी यांच्याशी बोलणी सुरू आहे. पश्चिम मधून राजू शिंदे यांना यांना यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र त्यांचा फोन नॉट रीचेबल येत असल्याचे कराड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orders from Shivsena BJP party to candidates for withdrawing the nomination at Aurangabad