साहित्य संमेलनाला न येण्याबाबत सहगल यांना आयोजकांचेच पत्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 जानेवारी 2019

लातूर : प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल या साहित्य संमेलनाला आल्या तर संमेलनात गोंधळ होईल, अशी शक्यता वर्तवून आयोजकांनी चक्क सहगल यांना ई-मेल पाठवून 'आपण संमेलनाला येऊ नका', अशी विनंती केली आहे. त्यामुळे आयोजकांवर दबाव कोणी टाकला, अशी चर्चा आता साहित्य वर्तुळात रंगू लागली आहे.

यवतमाळ येथे यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. याचे उद्गाटन सहगल यांच्या हस्ते होणार होते. पण मराठी भाषेच्या संमेलनाला इंग्रजी भाषेच्या लेखिका कशाला, असा सवाल मनसेसह काही संघटनांनी उपस्थित केला. या कारणावरून साहित्य संमेलनात गोधळ होऊ शकतो, असे सांगत आयोजकांनी सहगल यांना ई-मेल पाठविला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण याची साधी कल्पनासुद्धा आयोजकांनी साहित्य महामंडळाला दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आयोजकांनी या प्रकरणाबाबत तोंडावर बोट ठेवले आहे.

Web Title: Organizers letter to Sehgal about not coming to the Sahitya Sammelan