उस्मानाबाद कोरोना : ६७ रुग्णांची वाढ, तीन बाधितांचा मृत्यू

तानाजी जाधवर
Saturday, 24 October 2020

दिवसभरामध्ये १२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१३ टक्के एवढे झाले झाले आहे. तर मृत्युदर हा ३.३८ टक्के इतका झाला आहे. 

उस्मानाबाद :  जिल्ह्यात शनिवारी ६७ रुग्णांची वाढ झाली असून तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसभरामध्ये १२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१३ टक्के एवढे झाले झाले आहे. तर मृत्युदर हा ३.३८ टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत ७५ हजार ६२१ नमुन्यापैकी १४ हजार १५४ जणांना कोरोनाची लागन झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना होण्याचे प्रमाण १८.७२ टक्के इतके आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात शनिवारी (ता.२४) आढळलेल्या ६७ रुग्णापैकी २७ जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आलेत. तर ४० जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ९५ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यातील २७ जण पॉझिटिव्ह निघाले तर ६९८ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली त्यातील ४० जणांना कोरोनाची लागन झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामध्ये उस्मानाबाद १८ , तुळजापुर चार, उमरगा सहा, लोहारा दोन, कळंब ११, वाशी १६ , भुम पाच, परंडा पाच अशी तालुकानिहाय रुग्णसंख्या आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तीन मृत्यु 
वाशी तालुक्यातील लाखनगाव येथील ४५ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वाशी तालुक्यातील वासवंडी गावातील ४५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील ८५ वर्षीय स्त्रीचा उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. 

उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकुण रुग्णसंख्या- १४१५४
  • बरे झालेले रुग्ण- १२८९८
  • उपचाराखालील रुग्ण- ७७७
  • एकुण मृत्यु - ४७९
  • आजचे बाधित - ६७
  • आजचे मृत्यु - ०३

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad corona update news