
कोरोनाचे आज दिवसभरात २६ नवे रुग्ण, ३० बरे होऊन परतले
उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये गुरुवारी २६ कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे. दिवसभरात ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सुदैवाने एकाही मृत्युची नोंद झालेली नसली तरी मृत्युदर मात्र जैसे थेच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ३११ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९४.११ टक्के एवढे झाले आहे, तर मृत्युचा दर ३.६४ टक्के इतका आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जिल्ह्यामध्ये आता काहीप्रमाणात संशयिताच्या चाचण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसुन येत आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे चित्र आहे. १०३ जणांची स्वॅब चाचणी घेतल्यानंतर त्यापैकी २० जणांचे अहवाल पॉझिटव्ह आले आहेत. तर ४८७ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली त्यातील फक्त सहा जणांनाच लागन झाल्याने निश्चितपणाने कोरोनाची साथ हळहळु कमी होत असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. त्यातही उस्मानाबाद सात, कळंब ११, वाशी तीन , परंडा तीन, उमरगा दोन, वाशी तीन विशेष म्हणजे तुळजापुर, भुम व लोहारा या तालुक्यात एकही रुग्ण सापडलेला नाही.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
उस्मानाबाद कोरोना मीटर
(संपादन-प्रताप अवचार)