esakal | Corona Update : उस्मानाबादेत आज १९५ पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू; बळींचा आकडा १८४ वर.   
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

उस्मानाबाद जिल्ह्यात दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा मृत्युचा दर वाढल्याचे चित्र आहे. आता मृत्युदर २.८७ इतका झाला असून दररोज हा आकडा वाढत आहे. रिकव्हरीचे प्रमाण ६४ टक्क्यांवरुन कमी होत ६२.८१ इतके आले आहे.

Corona Update : उस्मानाबादेत आज १९५ पॉझिटिव्ह, सहा जणांचा मृत्यू; बळींचा आकडा १८४ वर.   

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद :  जिल्ह्यामध्ये गुरुवारी १९५ कोरोनाबाधितांची संख्या वाढली असून तर सहा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दोन दिवसामध्ये पुन्हा एकदा मृत्युचा दर वाढल्याचे चित्र आहे. आता मृत्युदर २.८७ इतका झाला असून दररोज हा आकडा वाढत आहे. रिकव्हरीचे प्रमाण ६४ टक्क्यांवरुन कमी होत ६२.८१ इतके आले आहे. गुरुवारी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण १४१ इतके आहे. आरटीपीसीआरमधुन ६९ व रॅपिड अँटिजेन टेस्टमधुन १२२ तसेच परजिल्ह्यामधील चार असे एकुण १९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. 

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

उस्मानाबाद तालुक्यामध्ये आरटीपीसीआरमधुन २४ व ६८ जणांच्या अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे आकडा वाढुन ९२ इतका झाला आहे. तुळजापुरमध्ये एकुण ४३ तर यामध्ये कोरोना टेस्टिंग सेंटरमधुन २० व अँटिजेन टेस्टमधुन २१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. उमरगा येथे २२ जणाना बाधा झाली आहे. त्यामध्ये टेस्टिंग सेंटरमधुन १२ तर अँटिजेन टेस्टमधुन १० जण पॉझिटिव्ह आले आहेत. कळंब मध्ये एकुण १९ जण बाधित झाले आहेत. त्यामध्ये नऊ जण टेस्टिंग सेंटर मधून पॉझिटिव्ह आले. तर दहा जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परंडा येथे पाच जण अँटिजेनमधून पॉझिटिव्ह आले. दोन जण इतर जिल्ह्यामध्ये बाधित झाले आहेत. लोहारा तालुक्यात आठ जण बाधित झाले असून भुममध्ये तीन व वाशीमध्ये एक जण पॉझिटिव्ह सापडला आहे.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन    

या भागातील रुग्णांचा झाला मृत्यू
१) उस्मानाबाद शहरातील गालिब नगर भागामध्ये राहणाऱ्या ५३ वर्षीय पुरुषाचा सोलापुर येथील खाजगी रुग्णालयामध्ये कोरोनाने मृत्यु झाला आहे.

२) उस्मानाबाद तालुक्यातील आळणी येथील ७५ वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

३) कळंब शहरातील एका ७१ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

४) कळंब तालुक्यातील नायगाव येथील ८५ वर्षीय पुरुषाचा लातुर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

५) तुळजापुर तालुक्यातील मुर्टा येथील ४० वर्षीय स्त्रीचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.

६) तुळजापुर तालुक्यातील नळदुर्ग येथील स्त्रीचा तुळजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.

कोरोना बळींचा आकडा १८४ वर

या नवीन सहा जणांच्या मृत्युमुळे मृत्यूचा आकडा १८४ वर गेला आहे. यामध्ये १९ मृत्युपैकी १३ मृत्यू हे मागील काही दिवसामध्ये बाहेरील जिल्ह्यामध्ये झाले असून पोर्टलवर त्याची गुरुवारी नोंद करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडुन देण्यात आली. 

(संपादन-प्रताप अवचार)