esakal | Corona Update : उस्मानाबादेत आज ७८ पॉझिटिव्ह, ५३९ जणांनी केली कोरोनावर मात
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

उस्मानाबाद तालुक्यातील २२ तुळजापुर १३ , उमरगा २७, परंडा सात, वाशी सात तर भुम येथील तीन रुग्णाचा समावेश आहे.

Corona Update : उस्मानाबादेत आज ७८ पॉझिटिव्ह, ५३९ जणांनी केली कोरोनावर मात

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : जिल्ह्यातील २७७ अहवालापैकी २२९ अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ७८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून अजूनही ४८ अहवाल येणे बाकी आहे. तर आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी ५३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  
उस्मानाबाद तालुक्यातील २२ तुळजापुर १३ , उमरगा २७, परंडा सात, वाशी सात तर भुम येथील तीन रुग्णाचा समावेश आहे. उस्मानाबाद शहरातील आठवडा बाजार एक, शंकर नगर एक, महात्मा गांधी नगर तीन, झुंझार नगर एक, समर्थ नगर एक, समता नगर चार, सांजा रोड दोन, तांबरी विभाग एक, जिल्हा रुग्णालय निवासस्थान एक, साळुंखे गल्ली एक, शिवाजी नगर एक,  हनुमान प्लॉट या भागामध्ये रुग्ण सापडले आहेत.

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन
तर तालुक्यातील शिंगोली व तेर येथे नविन रुग्ण आढळले आहेत. तुळजापुर शहरातील चार तसेच शुक्रवार पेठ दोन, तर तालुक्यातील तामलवाडी एक, अणदुर पाच, शुक्रवार पेठ दोन, नळदुर्ग पोलीस ठाणे एक या भागामध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. परंडा येथे निजामपुरा एक, मंडई पेठ एक, शिरसाव एक, पाचपिंपळा व खत्राबाद या ठिकाणी एक हे नवीन रुग्ण सापडले आहेत. भूममध्ये ईट एक, विद्यानगर एक, विजय नगर एक अशा तिन रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. तर वाशीमध्ये शिवशक्ती नगर येथील पाच, तेरखेडा दोन अशा सात जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

उमरगा शहरातील काळे प्लॉट एक, पतंगे रोड एक, इंदीरा चौक दोन, बालाजी नगर सहा, उपजिल्हा रुग्णालय , सदन नगर एक तर तालुक्यातील माडज दोन, तुगाव तीन, कवठा एक, गुंजोटी पाच, तुरोरी दोन, मुरुम दोन अशा २७ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता एक हजार ६९१ तर बरे होऊन गेलेले रुग्ण ५३९ आहेत. सध्या उपचार सूरु असलेल्या रुग्णाची संख्या १०९३ इतकी आहे.

संपादन-प्रताप अवचार