उस्मानाबाद जिल्ह्याच्या सिद्रामप्पा धरणे यांना सिव्हिल अभियांत्रिकीत मिळाले पेटंट

सुधीर कोरे
Monday, 30 November 2020

जेवळी (ता.कळंब) येथील प्रा. सिद्रामप्पा शिवशंकर धरणे यांना सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनास भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे.

जेवळी (जि.उस्मानाबाद) : जेवळी (ता.लोहारा) येथील प्रा. सिद्रामप्पा शिवशंकर धरणे यांना सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनास भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे. सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांना प्राप्त झालेला हा दुसरा पेटंट आहे. या महत्त्वपूर्ण संशोधनाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. जेवळी येथील रहिवासी असलेले प्रा.सिद्रामप्पा धरणे यांनी ‘गेट’ परीक्षा ही तीन वेळा उत्तीर्ण राहिले आहेत. त्यांचे आणखीन २३ पेटंट प्रकाशित झाले असून आजपर्यंत त्यांचे एकूण ३५ पेटंट नोंदणीकृत आहेत.

या व्यतिरिक्त विविध क्षेत्रातील त्यांचे ३६ शोधनिबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झाले आहेत. त्यांना २०१७ मध्ये यूएई या देशाकडून पाणी व ऊर्जा संबंधित संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांना प्राप्त झालेला हा दुसरा पेटंट आहे. यापूर्वी त्यांच्या ‘आर.सी.सी आणि फेरोसिमेंट बबल डेक स्लॅब’ या संशोधनास भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले होते. आता त्यांच्या 'अर्थक्विक रेसिस्टंट सर्कुलर कॉलम वुईथ मेन स्परल रेनफोर्समेन्ट' या सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनास भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाले आहे. सदरील पेटंट कॉलमची भारक्षमता व भूकंप रोधक हे अस्तित्वात असलेल्या कोलमपेक्षा अधिक आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad District's Sidramppa Dharne Get Patent In Civil Engineering