देवदर्शनाहून येताना भीषण अपघात; दोन भाविक ठार, १० जखमी

१० जण गंभीर जखमी
Osmanabad Accident News
Osmanabad Accident Newssakal

परंडा (जि.उस्मानाबाद) : शिखर शिंगणापूर येथून देवदर्शन करून निघालेल्या भाविकांचा पिकअप व उसाच्या ट्रॅक्टरचा परंडा ते सोनारी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात (Accident) दोघांचा मृत्यू तर, १० जण गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.१३) रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. भूम तालुक्यातील वडगाव नळी येथील भाविक शिखर शिंगणापूर येथील कावड यात्रा करून पीकअप वाहनाने गावाकडे परत निघाले होते. परंडा (Paranda) ते सोनारी मार्गावर कुंभेजा-भोंजा पाटीजवळ आले असता पीकअप व उस वाहतूक करणाऱ्या टॅक्टरची जोराची धडक झाली. (Osmanabad Accident Update Two Died, 10 Injured In Paranda)

Osmanabad Accident News
'मनसेने भोंगे लावल्यास त्यावरुन वाढत्या महागाईविषयी जनतेला माहिती द्यावी'

यात पिकअप उलटला. अपघातामध्ये दोन भाविक गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी परंडा व बार्शी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. तर १० भाविक गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे, सहायक पोलिस निरीक्षक जगताप यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना भाविकांना उपचारासाठी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या भीषण अपघातात भूम तालूक्यातील नळेगाव येथील मंगेश आत्माराम गायकवाड (वय २६) यांचा व बार्शी येथे उपचारासाठी दाखल केलेल्या एका तरूणाचा मुत्यू झाला आहे.

Osmanabad Accident News
अखंड भारताविषयी बोलू नका, असदुद्दीन ओवैसींचा मोहन भागवतांना सल्ला

अपघातात गंभीर जखमी झाल्याने वैभव भोजने, शुभम थिटे, प्रतिक भोजने, स्वप्नील भोजने, विनोद लोकरे, नवनाथ हारनोळ यांना पुढील उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर रोहित इनामदार, बिरूदेव हजारे, श्रीकृष्ण झेंडरे, नवनाथ शोगे (सर्व रा. वडगावनळी) व दादा कांबळे (रा. सावरगाव) यांच्यावर परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुरुवारी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com