Osmanabad | शहरात सातवहन काळातील जातं आढळून आले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद शहरात सातवहन काळातील जातं आढळून आले

उस्मानाबाद शहरात सातवहन काळातील जातं आढळून आले

उस्मानाबाद - शहरातील वैराग रोड भागात सातवहन काळातील जातं आढळून आले असल्याची माहिती इतिहास व पुरातत्व शास्त्राचे अभ्यासक जयराज खोचरे यांनी दिली आहे. हे जातं सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे बोलले जात आहे. उस्मानाबाद शहराला वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. शहराच्या परिसरात दूर्मिळ अशा धाराशिव लेण्यांचा समूह आहे. शिवाय लाचुंदा लेणी समुह नुकताच उघडकीस आला आहे. पुरातन काळात तेर येथे मोठा व्यापार होत असे. दक्षिण भारतातून व पश्चिम महाराष्ट्र, कोकणातून कच्चा माल तेर सारख्या व्यापारी ठिकाणी येत होता. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील डोंगर-दरीतून व्यापारी मार्ग तयार करीत येत होते. त्याच व्यापारी मार्गावर वसाहती स्थापन होत असत. जेथे राहण्यास, खाण्यास उत्तम सोय, तथे नव्याने वसाहती तयार होऊ लागल्या होत्या.

हेही वाचा: राजेश टोपेंबद्दल अपशब्द वापरल्याने बबनराव लोणीकरांविरोधात FIR दाखल

यात सिद्धेश्वर वडगाव, चिवरी, तीर्थ बु. तुळजापूर, अपसिंगा, वरवंटी, उस्मानाबाद आदी ठिकाणी सातवाहन काळातील खापरे, मनी , विटा अशा प्रकारच्या वस्तू सापडतात. उस्मानाबाद शहराच्या बाजूला वैराग रोड परिसरात खोचरे संशोधनात्मक अभ्यास करीत होते. त्यावेळी त्यांना हे जातं आढळून आले आहे. हे जातं सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे असल्याचे बोलले जात आहे. अजूनही हे जातं सुस्थितीत आहे. त्यामुळे येथील सातवहन काळातील संशोधनाला चालना मिळणार आहे.

वैराग रोड परिसरात `पांढरी` नावाने ओळख असलेला २० एकर क्षेत्राचा भाग आहे. तेथे जावून अभ्यास करीत असताना हे जातं पाहायला मिळाल. दगडी जातं आहे. जात्याला दोन बाजू असतात. त्यातील वरील भाग सापडला आहे. त्यावर दोन वेज आहेत. म्हणजे दोन महिलांना हे काम करावे लागत होते. त्यामुळे जास्त नागरिकाच्या घरातील हे जात असावं. तेरलाही अशी जातं सापडतात. या भागात आतापर्यंत खापर, विटा सापडत होत्या. पण, पहिल्यांदाच हा पुरावा मिळाला आहे. म्हणजे येथे नागरिकांची वस्ती होती. यावरून दिसून येत आहे.

- जयराज खोचरे, इतिहास व पुरातत्व खात्याचे अभ्यासक, उस्मानाबाद.

loading image
go to top