दिलासादायक : उस्मानाबादेत ८९.२४ टक्के रुग्ण झाले बरे !

तानाजी जाधवर
Friday, 16 October 2020

नवीन आलेल्या ५१ रुग्णापैकी दहा जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ९१ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते, त्यातील दहा जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये ५१ रुग्णाची वाढ झाली असुन दिवसभरामध्ये ३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या १२ हजार २४४ इतकी झाली असुन त्याचे प्रमाण आता ८९.२४ टक्के झाल्याचे दिसुन येत आहे. तर मृत्युचा दर देखील वाढलेलाच असल्याचे चित्र आहे. सध्या ३.२४ टक्के मृत्युदर असल्याने चिंता कायमच आहे. मृत्युचा दर कमी झाल्यास नक्कीच परिस्थिती नियंत्रणात येईल असा विश्वास जिल्हा प्रशासनाकडुन व्यक्त होत आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

नवीन आलेल्या ५१ रुग्णापैकी दहा जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४१ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ९१ स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते, त्यातील दहा जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ४९४ जणांची अँटिजेन टेस्ट करण्यात आली होती, तर त्यातील ४१ जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात २१ जणांना लागन झाल्याचे दिसुन येत आहे. त्यातील १९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असुन दोन जण आरटीपीसीआरद्वारे बाधित झाले आहेत. इतर तालुक्यामध्ये एकेरी आकडा असुन तुळजापुर तीन, उमरगा सहा, लोहारा दोन, कळंब नऊ, वाशी तीन, भुम पाच व परंडा दोन अशी तालुकानिहाय रुग्णसंख्या दिसुन येत आहे. उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील ५६ वर्षीय पुरुषाचा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकुण रुग्णसंख्या - १३७२१ 
  • बरे झालेले रुग्ण- १२२४४
  • उपचाराखालील रुग्ण- १०३२ 
  • एकुण मृत्यु - ४४५ 
  • आजचे बाधित - ५१ 
  • आजचे मृत्यु - ०१

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad corona Update 89.24 patients recover