esakal | उस्मानाबाद जिल्ह्यात गरोदर मातांनाही कोविड लस दिली जाणार
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद जिल्ह्यात गरोदर मातांनाही कोविड लस दिली जाणार

उस्मानाबाद जिल्ह्यात गरोदर मातांनाही कोविड लस दिली जाणार

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : गरोदर मातांनाही आता कोविड प्रतिबंधक लस Corona Vaccination दिली जाणार आहे. शुक्रवारी (ता.नऊ) जिल्ह्यामध्ये Osmanabad अशा महिलांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्तनदा माता यांच्या करिता यापूर्वीच लसीकरण सूरु केले असुन आता त्यामध्ये गरोदर महिलांचाही समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या बचावासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याने अधिकाधिक लसीकरण व्हावे, ही शासनाची भुमिका आहे. लसीमुळे संरक्षण मिळतेच जरी कोरोना झाला तरी आजाराची तीव्रता कमी राहत असल्याचे आजवरच्या पाहणीतून पुढे आले आहे. प्रतिबंधक लस या अगोदर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर, १८ वर्षांवरील नागरिक, स्तनदा माता यांच्या करित यापूर्वीच सुरु केली आहे. आता ही लस गरोदर मातांना देखील देण्यात येणार आहे. osmanabad corona vaccination updates from tomorrow covid jabs for pregnant women

हेही वाचा: भागवत कराडांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदाचा स्वीकारला पदभार

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गरोदर मातांना कोविड आजाराचा धोका व कोविड प्रतिबंधक लसीमुळे फायदे याचा विचार करुन कोविड लस घेण्याबाबत मान्यता दिली आहे. गरोदर माताना कोरोनाचा आजार झाल्यास इतर महिलांपेक्षा गरोदर मातांनामधील आजाराची तीव्रता अधिक असते. त्याचबरोबर गरोदर मातेसोबतच तिच्या गर्भाशयामध्ये वाढणाऱ्या बाळाच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. यामध्ये कमी कालावधीची प्रसुती होणे, प्रि एक्लामशिया, सिझेरीयनची शक्यता वाढणे, अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता भासणे, माता मृत्यु व नवजात बालक मृत्यु होणे अशा गुंतागुती निर्माण होण्याची भिती असते. ज्या गरोदर मातांना मधुमेह, दमा, सिक्लसेल आजार, ह्रदयरोग, किडनीचा आजार असे काही आजार असल्यास त्यांच्यामध्ये धोका होण्याचे प्रमाण अधिक वाढु शकते.

हेही वाचा: Hingoli : हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, पहाटेपासून सुरूवात

त्यामुळे गरोदर मातांना कोविड प्रतिबंधक लस देऊन त्यांना संरक्षित करण्यासाठी लस देण्याबाबत मान्यता देण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन्ही लसी गरोदरपणामध्ये देण्यासाठी सुरक्षित आहेत. ती दिल्यामुळे गरोदर माताचे कोरोनापासून संरक्षण मिळु शकते. जिल्ह्यामध्ये शुक्रवारी (ता.नऊ) सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र , ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान मधुन गरोदर माताना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे गरोदर मातांनी देखील स्वतःचे व होणाऱ्या बाळाचे आजारापासून संरक्षण होण्याकरिता ही लस घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

loading image