धक्कादायक! बलात्कारामुळे पत्नीने आत्महत्या केली आणि सहाव्या दिवशी पतीनेही घेतला गळफास

osmanabad news
osmanabad news

उस्मानाबाद: पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर याच्या वारंवार होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी एका महिलेने आत्महत्या केली होती. आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीने देखील तेच टोकाचं पाऊल उचलून स्वत:ला संपवून घेतल्याचा दुर्देवी प्रकार समोर आला आहे.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यानी एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये आत्महत्येचे कारण कथन केले आहे. व्हिडिओमध्ये पत्नीच्या आत्महत्येस देखील पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर यालाच जबाबदार धरले आहे. शिवाय सासरच्या लोकांनी देखील त्यांचे जीवन नकोसे केल्याचे त्यानी यामध्ये म्हटले आहे. सासरच्या लोकांच्या अशा वागण्यामुळे कोळेकरच्या विरोधात मी कसा लढा देऊ असा सवाल त्यानी विचारला होता.

व्हिडिओमध्ये आत्महत्या करणार असल्याचं बोलत असून, त्यानंतर  त्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे रविवारी रात्री उशीरा समोर आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण सांगताना त्यानी म्हटले आहे की, हरिभाऊ कोळेकर यांनी माझा हसता खेळता परिवार उध्वस्त केला आहे. माझ्या पत्नीला ब्लॅकमेल करून तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर माझ्या पत्नीने आत्महत्या केली.

"हरिभाऊ कोळेकरला वाटते की तो या प्रकरणातून सहज बाहेर पडेल. मात्र पोलिसांनी त्याला फाशी द्यावी अशीही विनंती यामध्ये केली आहे. या प्रकरणाने पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली असून अटक असलेल्या कोळेकर याच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. अगोदर पत्नी व आता पती यानी पोलिस कर्मचारी हरिभाऊ कोळेकर याच्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com