उस्मानाबाद : पीककर्जाचे उद्दिष्ट एक हजार ९०० कोटी

उस्मानाबाद जिल्हा : गतवर्षी ६४ टक्के कर्जवाटप
Osmanabad crop loan target for bank is 1900 crore
Osmanabad crop loan target for bank is 1900 croreSakal

उस्मानाबाद : जिल्ह्यासाठी यंदा पिक कर्ज वाटपासाठी बँकाना एक हजार नऊशे कोटीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. एप्रिलअखेरपर्यंत १६ टक्के वाटप करण्यात आले असून याच गतीने वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी ६४ टक्के इतके दोन्ही हंगामात वाटप झाले आहे. खरीपातील वाटप अधिक असून रब्बीमध्ये ते प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे.

खरीपपूर्व मशागतीचा काळ आता जवळ येत असल्याने त्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता भासते. त्यामुळे पिककर्ज घेण्यासाठी शेतकरी पुढाकार घेतात. एप्रिल महिन्यापासून ते जुलैपर्यंत खरीप हंगामात पिककर्ज घेण्यासाठी शेतकरी प्राधान्य देतो. त्यानंतरही अनेक शेतकरी पीककर्ज घेत असतात पण त्याचे प्रमाण अत्यल्प असते, अनेकदा बँका कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याकारणाने विलंबाने शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते.

काहीवेळा शेतकऱ्यांना हंगामात कर्ज दिले जात नसल्याचेही वास्तव आहे. दोन वर्षात पिक कर्ज वाटपाचा आकडा पन्नास टक्केच्या पुढे गेला आहे, अन्यथा त्या अगोदर तो ३५ ते ४० टक्केपर्यंत असायचा. प्रशासनाने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे तसेच काही लोकप्रतिनिधीनीही बँकाना धारेवर धरल्याने बँका काहीशा वठणीवर आल्याचे चित्र आहे. अजून हा आकडा वाढणे अपेक्षित असून गेल्यावर्षी ६४ टक्के पिक कर्ज वाटप झाले असुन यंदा एक हजार ९०० कोटीचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये खरीपासाठी एक हजार ३६८ कोटी तर रब्बीसाठी ५३२ कोटी पिक कर्जाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात खरीपामध्ये अधिकाधिक पिक कर्ज घेण्याकडे कल असतो.

येथील प्रमुख पिके ही खरीपात घेतली जातात, शेतकरीसुध्दा याच हंगामामध्ये कर्ज काढण्यास प्राधान्य देतो. रब्बी हंगामात भूम, परंडा वाशी या तालुक्यामध्ये पिके घेतली जातात. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही बँकावर नियंत्रण ठेवून त्यांच्या वाटपाकडे लक्ष्य ठेवण्याची गरज असून त्यानुसार अर्ज करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न झाल्यास या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. अन्यथा बँकांनी मुजोरपणा केल्यास ऐन हंगामात शेतकऱ्यांना पैशाची अडचण भासण्याचा धोका असतो. यावर्षी एप्रिलअखेरपर्यंत १६ टक्के वाटप झाल्याचे दिसत असले तरी जिल्हा बँकेचे वाटप अधिक असते. खासगी बँकाचे कर्ज वाटपाचे प्रमाण हे अत्यल्प असते ते वाढविण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com