esakal | उस्मानाबाद : रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; जिल्ह्यातच होणार बाजारपेठ
sakal

बोलून बातमी शोधा

रेशीम उद्योग.jpg

रेशीम कोष प्रक्रिया निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन एनसाई कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आता कर्नाटक ऐवजी जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

उस्मानाबाद : रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; जिल्ह्यातच होणार बाजारपेठ

sakal_logo
By
सयाजी शेळके

उस्मानाबाद : जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आता जिल्ह्यातच हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. रेशीम कोष निर्मितीमध्ये रांजणी (ता.कळंब) येथील नॅचरल उद्योग समूहाने पाऊल टाकले आहे. रेशीम कोष प्रक्रिया निर्मितीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन एनसाई कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते झाले. त्यामुळे जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना आता कर्नाटक ऐवजी जिल्ह्यातच बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

जिल्ह्यातील कळंब, वाशी आणि उस्मानाबाद तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते. अनेक शेतकरी त्यांच्या रेशीमचे कोष घेऊन कर्नाटकात विक्रीसाठी जातात. तेथे जागतिक दर्जाची बाजारपेठ असल्याने जिल्ह्यातील रेशीम कोषाला चांगला भाव मिळतो. दरम्यान रांजणी येथील नॅचरल उद्योग समुहाने रेशीम कोष प्रक्रिया निर्मितीच्या क्षेत्रात उतरले आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन स्वातंत्र्यदिनी एन. साई. साखर कारखान्याचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कारखान्याचे तांत्रिक संचालक अनिल ठोंबरे, हर्षल ठोंबरे, तज्ज्ञ संचालक ज्ञानेश्वरराव काळदाते, संचालक पांडूरंग आवाड, दिलीपराव भिसे, किशोर डाळे, विष्णू मोहिते, संभाजी रेड्डी, विष्णू डोलारे, रेशीम प्रकल्पाचे प्रभारी दिपक चांडगे आदी यावेळी मोठ्या संखेने उपस्थित होते.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

ठोंबरे म्हणाले की, जिल्ह्याच्या या भागात रेशीम कोषाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांना कोष विक्रीसाठी कर्नाटक गाठावे लागते. शेतकऱ्यांना जवळची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सुरुवातीच्या काळात ५०० किलो प्रतिदिन कोषावर प्रक्रिया करण्याचा आमचा संकल्प आहे. शेतकऱ्यांकडून जास्तीची आवक झाल्यानंतर आम्ही यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच शासनाच्या योजनेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेतीकडे वळावे. त्यांना शासनाकडून अनुदानही मिळत असल्याचा उल्लेख यावेळी ठोंबरे यांनी केला.

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

(Edit by Pratap Awachar)

loading image
go to top