१०५ शेतकऱ्यांनाच मिळाले तातडीचे कर्ज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

दहा हजारांच्या कर्जासाठी महिनाभरापासून हेलपाटे

उस्मानाबाद - मुख्यमंत्री, सहकारमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही तातडीचे कर्ज देण्यासाठी बॅंका प्रयत्न करताना दिसत नसल्याचे चित्र आहे. वारंवार सूचना येऊनही त्याला केराची टोपली दाखविली जात असल्याने शेतकरी हताश झाले आहे. मंगळवारपर्यंत (ता. २५) जिल्ह्यातील केवळ १०५ शेतकऱ्यांनाच तातडीच्या दहा हजारांची रक्कम देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नापिकी व दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कर्जमाफीची मागणी होत होती. दरम्यान, सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने असंघटित असलेल्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत संप पुकारला होता. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीच्या घोषणेबरोबरच पेरणी व मशागतीसाठी शेतकऱ्यांना तातडीची दहा हजारांचे कर्ज देण्याचीही घोषणा करण्यात आली होती; मात्र बॅंकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे उघड झाले आहे. एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज बॅंकांनी अद्याप दिलेले नाही. दुसऱ्या बाजूला शेतकरीच कर्ज घेण्यास तयार नसल्याचे बॅंकांकडून सांगितले जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री, सहकारमंत्री यांनी जिल्हाधिकारी व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना कर्ज देण्यासाठी बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी व सहकार विभागाने स्थानिक पातळीवर बॅंकांना सूचित केले; मात्र त्यानंतरही कर्ज दिलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत काही वाढ झालेली नाही. कागदपत्रांचा घोळ अन्‌ दहा हजारांचे कर्ज मिळण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रक्रियेत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न बॅंकांनी चालविल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्हा बॅंकेकडे तर रोख नसल्याने त्यांच्याकडे कर्ज मिळणे शक्‍यच नव्हते. त्यामुळे त्यांची यादी कोरीच असल्याचे दिसून येत आहे. हजारो शेतकऱ्यांना पैशाची गरज असतानाही आतापर्यंत केवळ १०५ शेतकऱ्यांना बॅंकांनी तातडीचे कर्ज दिले आहे.

Web Title: osmanabad marathwada news 105 farmer emergency loan