भाजपने हाती फक्त स्वप्ने ठेवली - चव्हाण

उस्मानाबाद - काँग्रेसच्या जनआक्रोश सभेला उपस्थित जनसमुदाय.
उस्मानाबाद - काँग्रेसच्या जनआक्रोश सभेला उपस्थित जनसमुदाय.

उस्मानाबाद - केंद्रात व राज्यात सत्तेवर येण्यापूर्वी अनेक वल्गना करणाऱ्या भाजपने सत्तेत आल्यानंतर जनतेच्या हातावर फक्त स्वप्ने ठेवण्याचे काम केले असून २०१९ मध्ये अशा थापा मारणारे सरकार चालणार नाही, हे सांगण्याची वेळ आली असून त्यासाठी जनतेने पेटून उठले पाहिजे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने मराठवाडा विभागातील जनआक्रोश सभा रविवारी (ता. पाच) उस्मानाबाद येथे पार पडली. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. पक्षाचे राज्यप्रभारी मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, पंतगराव कदम यावेळी उपस्थिती होते. 

सरकारला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी जनआक्रोश केला पाहिजे म्हणून काँग्रेसच्या वतीने सभा घेतल्या जात आहेत, असे स्पष्ट करुन खासदार चव्हाण म्हणाले, नोटबंदी, जीएसटीमुळे सर्वसामान्य व व्यापारी त्रस्त आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून कर्जमाफी झाली नाही. त्यामुळे या सरकारवर शेतकऱ्यांचा विश्‍वास राहिला नाही. कर्जमाफीबाबत चार महिन्यांत २५ शासन निर्णय सरकारने काढले. कर्जमाफी द्यायचीच नाही, असे सरकारने ठरविले असल्याचे यावरून दिसून येत आहे. नांदेडला परिवर्तन केले तसे गुजरातमध्येही करू असा विश्‍वासही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अमित देशमुख, अब्दुल सत्तार, मधुकरराव चव्हाण, बसवराज पाटील, सुभाष झांबड, शरद रणपिसे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

‘हे तर फसणवीस सरकार’
जनतेची फसवणूक करणारे राज्यातील फडणवीसांचे सरकार हे फसणवीस सरकार आहे अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. युनियन बॅंकेने सहा लाख ४८ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगितले होते. त्यानंतर एक लाख ३४ हजार शेतकरी पात्र असल्याचे सांगितले, म्हणजे पाच लाख लाभार्थी बोगस होते का ? असा प्रश्‍न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांची बोगस नोंदणी केल्याचे सांगितले जात असेल, तर अशा राष्ट्रीयीकृत बॅंकांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com