esakal | ह्रदयद्रावक : माऊली कोरोनामुक्त, आता मुलाच्या काळजीने तडफडतंय काळीज...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनामुक्त झालेल्या एका महिलेला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या महिलेचा नऊ वर्षांचा मुलगा पॉझिटिव्ह आल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सदर महिला मूळ कर्नाटकातील असून, डिस्चार्ज मिळाला. पण मुलावर उपचार सुरु असल्याने तूर्त ती रुग्णालयातील संशयित कक्षातच राहत आहे.

ह्रदयद्रावक : माऊली कोरोनामुक्त, आता मुलाच्या काळजीने तडफडतंय काळीज...

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि. उस्मानाबाद) : मुंबईहून नातेवाइकांसोबत आलेली एका महिला कोरोना पॉझिटिव्ह आल्याने येथील कोविड रुग्णालयात २१ मेपासून तिच्यावर उपचार सुरू होते. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्सनुसार शनिवारी (ता. ३०) दहाव्या दिवशी या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र या महिलेचा नऊ वर्षांचा मुलगा पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सदर महिला मूळ कर्नाटकातील असल्याने तूर्त ती रुग्णालयातील संशयित कक्षातच आहे.

उमरगा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या कर्नाटकातील एक महिला पतीच्या अकाली निधनानंतर उदरनिर्वाहासाठी कांदिवली (मुंबई) येथे नातेवाइकाकडे आपल्या दोन मुलांसह गेल्या दोन वर्षांपासून होती; मात्र कोरोनाच्या भीतीने ती आपल्या चिमुकल्यांसह नातेवाइकांसोबत १७ मे रोजी खासगी बसने उमरग्यातील नातेवाइकांकडे परतली होती.

हेही वाचा : Corona Update : परभणीत ६० वर्षीय व्यक्ती काल पॉझिटिव्ह, आज मृत्यू  

दोन दिवसांनंतर महिलेला अस्वस्थ वाटू लागल्याने तिचे स्वॅब पाठवले होते. २१ मे रोजी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, या महिलेच्या पाच वर्षांच्या मुलाचा अहवाल निगेटिव्ह आला; मात्र नऊ वर्षांच्या मुलाचा अहवाल बुधवारी (ता.२७) रात्री पॉझिटिव्ह आला. मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेला दुःख अनावर होत आहे. ती कोरोनामुक्त झाली असली तरी आता मुलाच्या काळजीने या माऊलीचं काळीज तडफडतंय. 

डिस्चार्ज मिळाला तरी रुग्णालयातच 
कठीण परिस्थितीतही या माऊलीने मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले; मात्र कोरोनाने ही माऊली हताश झाली आहे. हाल सहन करीत ती गावाकडे परतली. कोरोनाची बाधा झाल्यानंतरही स्वत:ला सावरत मुलांसाठी धैर्याने सामोरे गेली; पण आता मुलाला बाधा झाल्याने ती अस्वस्थ झाली. तिला शनिवारी डिस्चार्ज मिळाला असला तरी ती रुग्णालयाच्या संशयित कक्षातच राहत आहे.

हेही वाचा - केळी पिकाला लॉकडाउननंतर उन्हाचा फटका 

रुग्णालय प्रशासनाने डिस्चार्ज रिपोर्ट पालिकेला पाठविला आहे. त्या महिलेला इन्स्टिट्युशनल क्वारंटाइनमध्ये ठेवता येते; पण तिची कौटुंबिक अडचण अन्‌ मुलाला झालेली कोरोनाची बाधा या दुहेरी अडचणीमुळे तूर्त ती रुग्णालयात आहे. दरम्यान, या महिलेसह मुलगा रोगमुक्त झाला, तर एक बेघर कुटुंबाच्या पुढच्या जीवनाला नवी दिशा मिळू शकते. 

आठ पोलिसासह २३ जणांचे स्वॅब पाठविले 
शहरासह तालुक्यात आलेल्या परजिल्ह्यातील लोकांमुळे कोरोनाचा विळखा वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या उमरग्यातील तीन, बेडगा येथील दोन, केसरजवळग्यातील तीन तर कोथळी येथील एक असे नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. त्यात एका ६० वर्षांची ज्येष्ठ महिलेसह तीन मुलांचा समावेश आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.२९) आठ पोलिसांसह १४ जणांचे स्वॅब पाठविण्यात आले आहे. तर शनिवारी (ता.३०) आणखी नऊ जणांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले.

loading image
go to top