उमरगा पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत नागम्मा चिंचोळी विजयी | Osmanabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Umarga Panchayat Samiti Vice Chairman Election
उमरगा पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत नागम्मा चिंचोळी विजयी

उमरगा पंचायत समितीच्या उपसभापती निवडणुकीत नागम्मा चिंचोळी विजयी

उमरगा (जि.उस्मानाबाद) : सव्वा वर्षापासून रिक्त असलेल्या उपसभापतीपदासाठी बुधवारी (ता. २४) पीठासन अधिकारी तथा तहसीलदार राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली.  उपसभापतीपदी काँग्रेसच्या (Congress Party) नागम्मा सायबण्णा चिंचोळे यांनी शिवसेनेच्या क्रांती व्हटकर यांच्यापेक्षा सहा मते अधिक घेऊन विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या सदस्या असलेल्या फातिमाबी जाफरी यांचे निधन झाल्यामुळे नव्याने उपसभापती पदाची निवउणूक होणे अपेक्षित होते. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईत निवड (Umarga Panchayat Samiti) राहुन गेली होती. या संदर्भात सकाळमध्ये १० नोव्हेंबरला वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या हालचाली सुरू झाल्या. (Osmanabad)

उशीरा का होईना निवडणूक

उमरगा पंचायत समितीत अठरा सदस्य संख्यांपैकी नऊ सदस्य काँग्रेसचे, चार राष्ट्रवादीचे, भाजपचे तीन, तर शिवसेनेचे दोन सदस्य संख्या असताना पहिल्या अडीच वर्षात काँग्रेसने बहुमतासाठी भाजपला जवळ करुन उपसभापतीपद दिले होते. दुसऱ्या टप्प्यात महाविकास आघाडीचा बोलबोला सुरु झाल्यानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी एकत्र आले. काँग्रेसचे सचिन पाटील सभापती, तर राष्ट्रवादीच्या श्रीमती जाफरी उपसभापती झाल्या. परंतू दुर्देवाने काही काळानंतर त्यांचे निधन झाले. आणि या पदासाठी उशीरा का होईना बुधवारी निवडणूक झाली. १८ सदस्यांपैकी दोन सदस्यांचे निधन झाल्याने सोळा सदस्य मतदानासाठी पात्र होते. मात्र निवडी दरम्यान बारा सदस्य उपस्थित होते. कॉंग्रेसच्या नागम्मा चिंचोळे यांनी बारापैकी नऊ मते मिळवत विजयी झाल्या. शिवसेनेच्या क्रांतीताई व्हटकर यांना केवळ तीन मते मिळाली. यावेळी कॉंग्रेस एक, भाजपचे दोन, राष्ट्रवादीचा एक असे चार सदस्य गैरहजर होते.

हेही वाचा: Beed : गेवराईत एकाच नंबरच्या आठ रिक्षा, पोलिसांनी केली कारवाई

गटविकास अधिकारी कुलदीप कांबळे, महसूल सहायक दत्ता पवार, पंचायत समितीचे वरिष्ठ सहायक एन. आर. घुमे, कक्ष अधिकारी श्री शेरकर यांचे उपस्थितीत निवड प्रक्रिया घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत कॉंग्रेसचे एक, भाजपचे दोन व राष्ट्रवादी एक असे चार सदस्य गैरहजर असल्याने १२ सदस्य सभागृहात हजर होते. सकाळी दहा ते बारापर्यंत उपसभापती पदासाठी तीन अर्ज दाखल झाले. त्यात कॉंग्रेस पक्षाच्या नागम्मा चिंचोळे, राष्ट्रवादीच्या जयश्री पवार व शिवसेनेच्या क्रांतीताई व्हटकर यांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर राष्ट्रवादीच्या पवार यांनी अर्ज मागे घेतल्याने उपसभापती पदासाठी दोन सदस्यांना हात उंचावून मतदान घेण्यात आले. कॉंग्रेसच्या चिंचोळे यांना नऊ तर शिवसेनेच्या व्हटकर यांना तीन मते मिळाली. दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन सदस्या पैकी एका सदस्याने कॉंग्रेस तर एका सदस्याने शिवसेनेला मतदान केले.

loading image
go to top