पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

भूम - पावसाअभावी तालुक्‍यातील खरिपाच्या पिकांची परिस्थिती ना जगू देईना, ना मरू देईना अशी झाली आहे. सध्या उडीद, मूग, तूर, कापूससह खरिपातील कडधान्य ऐन भरात आले असता पावसाने अधूनमधून दांडी मारल्याने पिके कधी कोमात तर कधी जोमात दिसून येत आहेत. यंदा सुरवातीच्या पावसामुळे खरीप पिकांवर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र पावसाने खरिपातील पिके ऐन भरात आल्यावर अधून-मधून पडल्याने तालुक्‍यातील बहुतांश भागात पिकांची उंची खुंटली तर काही भागात अळीचा प्रादुर्भाव दिसून आला.

भूम - पावसाअभावी तालुक्‍यातील खरिपाच्या पिकांची परिस्थिती ना जगू देईना, ना मरू देईना अशी झाली आहे. सध्या उडीद, मूग, तूर, कापूससह खरिपातील कडधान्य ऐन भरात आले असता पावसाने अधूनमधून दांडी मारल्याने पिके कधी कोमात तर कधी जोमात दिसून येत आहेत. यंदा सुरवातीच्या पावसामुळे खरीप पिकांवर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, मात्र पावसाने खरिपातील पिके ऐन भरात आल्यावर अधून-मधून पडल्याने तालुक्‍यातील बहुतांश भागात पिकांची उंची खुंटली तर काही भागात अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. सतत दुष्काळामुळे तालुक्‍यात गत दोन वर्षापूर्वी जवळपास ५० जनावरांच्या छावण्या तर शंभर ते १२५ पिण्याच्या पाण्याचे टॅंकर चालू करावे लागले होते. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चही केले होते. मात्र गेल्या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावून नदी-नाले, तळी या भागातील फुल झाले होते. यामुळे गेल्या दहा वर्षातील सरासरीही पावसाने ओलांडली होती. 

याच धरतीवर यंदाही जूनच्या सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्याने या महिन्यातील पावसाने गेल्या वर्षीच्या पावसाची सरासरी ओलांडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नवचैतन्य संचारले. यामुळे खरिपाची पेरणीही योग्य वेळी केली. पिकेही जोमात उगवली, मात्र निसर्गाने आपली अवकृपा दाखवायची चालू केली. पाऊस अचानक बंद झाला. तब्बल २० ते २५ दिवसाने पावसाने हजेरी लावली. 

तोवर पिकांची उंची खुंटली तर काही भागात पिकांवर अळीही दिसून तर काही भागात पिके फुलोऱ्यात आली असून, पावसाने अधूनमधून रिमझिम चालू केल्याने पाऊस पिकांना जगूही देईना, मरुही देईनाशी परिस्थिती सध्या तालुक्‍यात आहे.

Web Title: osmanabad news agriculture crop