पोलिस, युवकांच्या सतर्कतेमुळे अपहरण झालेल्या तरुणाची सुटका

नेताजी नलवडे
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अपहरण केल्यानतंर मुलाच्या नातेवाईकांना फोन करुन मुलाच्या बँक अकाउंटवर पैसै टाकण्यास आरोपी सांगत होते.

वाशी : हिंगोली येथून अपहरण करुन आणलेल्या गणेश श्रीकृष्ण शिंदे या सोळावर्षीय युवकाची पारगाव (ता. वाशी) येथील युवक व पोलिसांच्या सतर्कतेने पाच आरोपींच्या तावडीतून सुटका झाली. सोमवार (ता. २१) रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव येथील विसावा हॉटेल येथे सुटका झाली. यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, एक आरोपी फरार आहे.

यावेळी गुन्ह्यात वापरलेली कार व कारमधून एक मोबाईल व काही धारदार शस्त्रेही पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहेत.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवार (ता. २१) राष्ट्रीय महामार्गावरील पारगाव येथे सकाळी साडेअकरा वाजता एमएच २१ व्ही ७२८९ या क्रमांकाच्या कारमधून प्रवास करत असलेले आरोपी रोहित हनुमंत राक्षे (रा. मोशी जि. पुणे) गजानन अंकुश शिंदे (रा. मोशी, जि. पुणे) ऋषिकेश महादेव कोकणे (रा. पारगाव ता. वाशी) सुनिल देंवेंद्र आसेरकर (रा. आंळदी, पुणे) रामेश्वर आप्पासाहेब तौर रा. आळंदी पुणे हे बीडकडून पारगाव येथील विसावा हाँटेल समोर आले असता त्यांनी हाँटेलसमोर असलेल्या पाण्याच्या पाईपवरुन त्यांची कार घातली यावेळी पाण्याचा पाईप फुटला त्यामुळे हाँटेल मालक व आरोपीमध्ये भांडण झाले.

हे भांडण सुरु असताना आरोपीपैकी गाडीत असलेली हत्यारे काढा आपण याला बघुच असे म्हणत होते. माञ तोपर्यत परिसरातील युवक तेथे जमा झाले होते. यावेळी युवक मोठ्या प्रमाणात जमा झाल्याचे पाहुन आरोपीनी तेथुन पळ काढला. गाडीत कसली हत्यारे आहेत हे पाहाण्यासाठी काही युवकांनी गाडीचे दरवाजे व डिग्गी उघडली असता. गाडीत विविध प्रकारची धारदार हत्यारे आढळुन आली. तर डिग्गी मध्ये हिंगोली येथुन अपहरण करुन आणलेला मुलगा गणेश श्रीकृष्ण शिंदे हा होता . तो ओरडू नये म्हणुन त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लावलेली होती तर हातपाय बांधलेले होते.

हे पाहाताच आरोपी पळुन गेलेल्या लोणखस ता. वाशी च्या दिशेने पारगाव येथील युवकांनी आरोपीचा पाठलाग केला तोपर्यत तेथे पोलिसही दाखल झाले होते पोलिसांनीही आरोपीचा पाठलाग करत लोणखस शिवारात या पाचही आरोपीना पकडण्यात युवक व पोलिसांना यश आले.

वार शनिवार (ता. १९) रोजी गणेश श्रीकृष्ण शिंदे हा हिंगोली येथील एका एटिएम मधून पैसै काढुन बाहेर येतअसताना आरोपिनी त्याचे अपहरण करुन त्याला  कारमधील डिग्गीमध्ये ठेवले होते. गणेश शिंदे गायब झाल्याची तक्रार ता. १९ रोजीच हिंगोली येथील पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या वडिलानी दिली होती. त्यावरुन CR NO 396/2017कलम 365, 363 नुसार अपहरणाचा गुन्हा हिंगोली पोलिस स्टेशनमध्ये  नोंद झालेला आहे. अपहरण केल्यानतंर मुलाच्या नातेवाईकांना फोन करुन मुलाच्या बँक अकाउंटवर पैसै टाकण्यास आरोपी सांगत होते. पैसै न टाकल्यास मुलाला जिवे मारण्याचि धमकी दिली जात होती. त्यामुळे नातेवाईकांनी काही पैसै मुलाच्या बँकअकाउंटवर टाकले होते. हे पैसै कुठल्या एटिएमवर काढले जातात हे पाहुण व मोबाईलच्या लोकेशनवरुन मुलाचे नातेवाईक व हिंगोली येथील पोलिसही त्यांचा पाठलाग करत होते. या कारवाईमध्ये पोलिस निरिक्षक डंबाळे यांच्या आदेशावरुन पि एस आय बगाड पोलिस महादेव राऊत फैय्याज काझी बबन जाधवर सदाशिव पांचाळ गणेश खैरे प्रविण माने सुर्यकांत ढाकणे सुरेश राऊत सहभाग घेतला तर पारगाव येथील युवक तात्यासाहेब बहिर श्रीनिवास उंदरे भाऊसाहेब उंदरे तुषार उंदरे सिकंदर पवार चंदर पवार आदींनी सहकार्य केले.

Web Title: osmanabad news hingoli abducted youth escaped