पन्नास किलोमीटरपर्यंत नदी खोलीकरणाची कामे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

उस्मानाबाद - सूर्योदय परिवाराकडून जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तब्बल ५० किलोमीटरपर्यंत नदी खोलीकरणाची कामे करण्यात आली आहेत. २०१७ मध्ये झालेल्या कामामुळे एक हजार ५२३ टीएमसी पाणीसाठा होणार आहे. 

दुष्काळी स्थिती निवारण्यासाठी सूर्योदय परिवार, तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाकडून जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षी नालाखोलीकरण, सरळीकरणाची कामे केली जात आहेत. यंदाही जिल्ह्यातील चार तालुक्‍यांत खोलीकरणाची कामे करण्यात आली. 

सर्वाधिक तुळजापूर तालुक्‍यात कामे केली आहेत. खुदावाडी येथे आठ किलोमीटर, व्होर्टी साडेसहा, मुर्टा साडेआठ, गंधोरा दोन मेसाई जवळगा चार, तर येवतीमध्ये तीन किलोमीटर नदीचे खोलीकरण करण्यात आले आहे. 

उस्मानाबाद तालुक्‍यातील आरणी येथे साडेसहा, तसेच येडशी येथे एक किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. कळंब तालुक्‍यातील हळदगाव, सातेफळ दरम्यान तीन किलोमीटर, सौंदणा येथे दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तर वाशी तालुक्‍यातील बावी येथे पाच हजार किलोमीटर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. 

यंदा सूर्योदय परिवाराने केलेल्या कामातून तब्बल १५ लाख २४ हजार २०३ घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला. तुळजापूर तालुक्‍यातील व्होर्टी येथे सर्वाधिक तीन लाख ६६ हजार २७५ घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कामाच्या माध्यमातून तब्बल एक हजार ५२३ टीएमसी एवढा पाणीसाठा होणार आहे. 

२०२१ पर्यंत सर्व नद्यांचे खोलीकरण
जिल्ह्यातील प्रमुख नद्यांचे खोलीकरण करण्याचा सूर्योदय परिवराचा मानस आहे. २०२०-२१ पर्यंत जिल्ह्यातील तेरणा, भोगावती, बोरी, रायखेल, बेन्नीतुरा, बानगंगा, मांजरा, कन्हेरी आदी प्रमुख नद्यांच्या खोलीकरणाची कामे केली जाणार असल्याचे परिवाराचे राज्य सचिव कैलास चिनगुंडे यांनी सांगितले.

Web Title: osmanabad news rain river