जिल्ह्यातील ऊस गाळप मराठवाड्यात सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

उस्मानाबाद - साखर कारखाने सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले असून, सध्या तरी पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू आहेत. सद्य:स्थितीला जिल्ह्याचे गाळप मराठवाड्यात सर्वाधिक असल्याचे चित्र आहे. दहा कारखान्यांचे जवळपास १७ लाख मेट्रिक टन गाळप पूर्ण होत आहे. तर साखर उताराही साडेनऊ टक्‍क्‍यांपुढे गेला आहे. थंडीचा चांगला परिणाम उसाच्या उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. 

जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी केवळ दोनच साखर कारखाने सुरू होते. दुष्काळी स्थितीमुळे ऊस पिकाला चांगला फटका बसला होता. परिणामी साखर कारखान्यांना हंगाम बंद ठेवण्याची वेळ आली होती. 

यंदा कारखाने सुरु झाले असून फेब्रुवारीपर्यंत कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू राहतील इतके क्षेत्र उपलब्ध आहे. त्यापुढे मात्र कारखान्यांना ऊस मिळणे कठीण जाईल अशी परिस्थिती आहे. तसे असले तरी बंद राहिलेल्या काळाचा तोटा भरून काढण्यासाठी कारखानदार आताच गाळप अधिक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यामध्ये सर्वाधिक गाळप नॅचरल शुगरकडून करण्यात आले आहे. सव्वातीन लाख मेट्रिक टनापर्यंत गाळप झाले असून, उताराही ९.७७ टक्के इतका मिळाला आहे. तर मुरूमच्या विठ्ठलसाई कारखान्याचा सव्वादहा टक्‍क्‍यांपुढे गेला आहे. तर सर्वात कमी उतारा भीमाशंकर कारखान्याचा निघाला आहे. ८.४१ टक्केच उतारा असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या दरावर होतो. अधिकाधिक उतारा मिळाल्यास पुढील वर्षी चांगला दर मिळतो. 

डिसेंबरमध्ये साखर उतारा चांगला वाढला असून, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे साधारण या काळातच ऊस गाळप करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. नोव्हेंबरअखेर उतारा घटला होता. तर आता फेब्रुवारीच्या पुढील काळात उताऱ्यात घट होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे.

Web Title: osmanabad news sugarcane galap record in marathwada