निरीक्षकाच्या पत्नीची गोळी झाडून आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

येरमाळा, (जि. उस्मानाबाद) - येथील पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या पत्नी मोना चव्हाण (वय 27) यांनी घरी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. 25) घडली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. चव्हाण येरमाळा येथे प्रभारी म्हणून कार्यरत असून, लक्ष्मी-पार्वतीनगरमध्ये भाड्याने राहतात. ते सकाळी नऊच्या सुमारास स्नानासाठी गेले होते. याचदरम्यान त्यांना गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यांनी पाहणी केली असता पत्नीने पोटात गोळी झाडून घेतल्याचे आढळले. मोना यांना तातडीने बार्शी येथील रुग्णालयात हलविले.

येरमाळा, (जि. उस्मानाबाद) - येथील पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या पत्नी मोना चव्हाण (वय 27) यांनी घरी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (ता. 25) घडली. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकलेले नाही. चव्हाण येरमाळा येथे प्रभारी म्हणून कार्यरत असून, लक्ष्मी-पार्वतीनगरमध्ये भाड्याने राहतात. ते सकाळी नऊच्या सुमारास स्नानासाठी गेले होते. याचदरम्यान त्यांना गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यांनी पाहणी केली असता पत्नीने पोटात गोळी झाडून घेतल्याचे आढळले. मोना यांना तातडीने बार्शी येथील रुग्णालयात हलविले. तेथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस अधीक्षक व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून, शुक्रवारी पंचनामा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

 

Web Title: osmanabad news suicide crime