टायर फुटल्याने टेम्पो जीपवर जोरदार आदळले, तीन जण गंभीर जखमी 

अविनाश काळे
Thursday, 21 January 2021

कर्नाटकातील कामे आटोपून गावाकडे निघालेल्या ऊसतोड कामगारांच्या  पिकअप टेम्पोचे अचानक टायर फुटल्याने टेम्पो जीपवर जोरदार आदळले.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : गुलबर्गा-लातूर महामार्गावरील मातोळा पाटीजवळ जीप व पिकअप टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात नऊ जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरूवारी (ता.२१) दुपारी चार वाजता घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील कलदेव निंबाळा येथील रहिवाशी व येणेगुरच्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असलेले सी.जी.पाटील यांची पत्नी व दोन मुली असे तिघे जीपमधून (एमएच २५ एएस १०९१) लातूर येथे रुग्णालयात गेले होते.

ग्रामपंचायतला पडली 'बारा' मते... मग पठ्ठ्याने बॅनर लावून मानले मतदारांचे 'जाहीर आभार'

ते लातूरहून गावाकडे परत येताना गुलबर्गा-लातूर मार्गावरील मातोळा गावाजवळ कर्नाटकातील कामे आटोपून गावाकडे निघालेल्या ऊसतोड कामगारांच्या  पिकअप टेम्पोचे अचानक टायर फुटल्याने टेम्पो जीपवर जोरदार आदळले. यात टेम्पो रस्त्यावर पलटी झाला. जीप व टेम्पोच्या झालेल्या अपघातात जीपचे चालक श्रीकृष्ण काशीनाथ बिराजदार (वय ३७ रा. काळनिंबाळा), रसिकाबाई चंद्रकांत पाटील (५३) , शिल्पाराणी चंद्रकांत पाटील (२८), शीतल चंद्रकांत पाटील (२२, सर्व रा. कलदेव निंबाळा, ता.उमरगा) टेम्पो चालक ज्ञानेश्वर आत्माराम गायकवाड (वय ३४ रा. पिंपळगाव, ता.केज), श्रीकृष्ण विश्वनाथ कदम (४०), उर्मिला श्रीकृष्ण कदम (३४), प्रगती श्रीकृष्ण कदम (वय आठ,  रा. तिघेही कदमवाडी, ता.केज), रवी बापु कोराडे ( २४, रा. कोरडेवाडी, ता.केज) हे नऊ जण जखमी झाले आहेत.

मराठवाड्याच्या आणखी बातम्या वाचा

 चंद्रकांत पाटील, शिल्पाराणी पाटील व शीतल पाटील गंभीर जखमी असल्याने तिघांना सोलापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर उर्वरित सहा जणांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News Three People Serious Injured In Accident Umarga