नॅचरल शुगरकडून ३३ लाख २२ हजारांचा निधी

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करताना रांजणी येथील नॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडचे बी. बी. ठोंबरे.
उस्मानाबाद : जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द करताना रांजणी येथील नॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडचे बी. बी. ठोंबरे.
Updated on

उस्मानाबाद : कोरोनाग्रस्तांसाठी लागणारी औषधी व साहित्य खरेदी, तसेच गरजूंसाठी उपाययोजना करण्यासाठी रांजणी (ता. कळंब) येथील नॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३३ लाख ११ हजार ७७१ रुपयांचा निधी देण्यात आला.

कारखान्याचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक बी. बी. ठोंबरे यांनी सोमवारी (ता. १३) जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला. 
कोरोनाग्रस्तांसाठी लागणारी औषधी, अन्य साहित्य तसेच गरजूंसाठी भोजन व्यवस्था व अन्य उपाययोजना करण्यासाठी नॅचरल शुगर ॲन्ड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३३ लाख ११ हजार ७७१ रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. या निधीचा धनादेश श्री. ठोंबरे यांनी जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांच्याकडे सुपूर्द केला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा   

श्री. ठोंबरे म्हणाले, की राज्यावर ओढावलेल्या आपत्तीमध्ये सामाजीक जाणिवेतून नॅचरल उद्योग समूहाच्या माध्यमातून शासकीय कार्यात वेळोवेळी मदतीचा हात दिलेला आहे. त्याचप्रमाणे यावर्षी आपल्यावर आलेल्या आरोग्य आपत्तीवर मात करण्यासाठी आम्ही अल्कोहोल बेस सॅनिटायझरचे उत्पादन करून अत्यंत माफक दरात सर्वसामान्य जनतेसाठी ते उपलब्ध करून दिलेले आहे. या साथीच्या रोगाचा फैलाव 
रोखण्यासाठी शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आम्ही नॅचरल शुगरच्या माध्यमातून आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे. या प्रमाणे राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी आर्थिक मदत केल्यास साखर उद्योगातून शंभर कोटींची आर्थिक मदत जमा होईल. राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहनही श्री. ठोंबरे यांनी साखर उद्योजकांना केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Parbhani SIR
Shirur Kasar Loan Waiver
Beed Water Shortage
Dharashiv Drug Bust Ganja And Charas Seized Along With 22 Tola Gold And Cash Worth Nearly 70 Lakh In Police Raid
Marathi News Esakal
www.esakal.com