उस्मानाबाद : 24 तासात केवळ 24 मिलिमीटर पाऊस

केवळ ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामुळे कामांमध्ये अडथळे येत असल्याचे नागरी सांगत आहेत.
Rain
Rainsakal
Updated on

उस्मानाबाद : राज्याच्या कानाकोपऱ्यात मुसळधार पाऊस होत असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झाले नसले तरी पावसाची केवळ संततधार सुरू आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढलेली नसून अनेक प्रकल्पही कोरडीच आहेत.

मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे. तुळजापूर तसेच भूम तालुका वगळता जिल्ह्यातील इतर सहा तालुक्यात पाऊस झालेला नाही. केवळ ढगाळ वातावरण आणि पावसाची रिपरिप यामुळे कामांमध्ये अडथळे येत असल्याचे नागरी सांगत आहेत.

Rain
सिक्सर मारेन अन् बघणारही नाही.... फ्लेचरचा No Look SIX पाहाच

24 तासात केवळ 24 मिलिमीटर पाऊस

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी 24 मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात 19, परंडा 15, कळंब 20, भूम 21, लोहारा 23, उमरगा 30 तर वाशी मध्ये 49 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे रविवारी रात्री तसेच सोमवारी दिवसभर केवळ सोळा मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात संततधार सुरू असली तरी भूजल पातळी वाढेल एवढा पाऊस झालेला नाही.

Rain
200 वर्षांपूर्वीचा मुंबई-पुणे प्रवास

पातळी खालावलेली

मोठा पाऊस झालेला नसल्याने कूपनलिकाना पाणी वाढले असले तरी अनेक विहिरी अद्याप कोरद्या आहेत. तर काही भागातील विहिरी अर्ध्यावर आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी अजूनही पुरेशा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्याच्या खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र एवढ्या पावसावर रब्बी पिकांची आशा मात्र धूसर दिसत आहे.

प्रकल्पात अपुरा पाणीसाठा

जिल्ह्यात एक मोठा, 17 मध्यम तर 187 लघु प्रकल्प आहेत. यातील काही प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. तर सुमारे 30 प्रकल्पातील पाणी पातळी ज्योतीखाली आहे. सर्वाधिक मोठा असलेला सीना-कोळेगाव प्रकल्पात सध्या मृत पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी या प्रकल्पातील पाणी पातळी वाढलेली नाही. तर इतरही अनेक प्रकल्पांची अशीच अवस्था आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com