उस्मानाबादमध्ये एसपीच्या विरोधात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

तानाजी जाधवर
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

उस्मानाबाद ः पोलिस अधिक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्टाच्या त्रासाला कंटाळुन थेट दिड दिवसाची रजा घेऊन विशेष पोलिस महानिरिक्षकांकडे तक्रार केली आहे. सामुहिक रजेचे हत्यार जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विरोधातच उगारले असुन कर्मचाऱ्यांनी एस.पी.च्या विरोधात बंड पुकारल्याने खळबळ उडाली आहे. 

उस्मानाबाद ः पोलिस अधिक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्टाच्या त्रासाला कंटाळुन थेट दिड दिवसाची रजा घेऊन विशेष पोलिस महानिरिक्षकांकडे तक्रार केली आहे. सामुहिक रजेचे हत्यार जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या विरोधातच उगारले असुन कर्मचाऱ्यांनी एस.पी.च्या विरोधात बंड पुकारल्याने खळबळ उडाली आहे. 

विशेष पोलिस महानिरिक्षकांना कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कार्यालयीन कर्मचारी सध्या कार्यालयाच्या वेळेत व वेळ संपल्यानंतरही कामकाज करत आहोत. पोलीस अधिक्षक यांच्याकडुन अपमानास्पद वागणुक दिली जात आहे.पोलीस अधिक्षक हे बोलताना दुय्यम वागणुक देऊन अमपानित करतात, शिवीगाळ करतात, ज्यामुळे स्वाभिमान दुखावुन मानसिक त्रास होत आहे. 70 टक्के कर्मचारी यांच्या छोट्या छोट्या कारणामुळे इनक्रिेंमेट बंदची शिक्षा दिलेल्या आहेत. वारंवार बडतर्फ, निलंबित करण्याची धमकी दिली जात आहे.

कामकाज करताना एकाचवेळी अनेक कामे सांगुन तत्काळ निर्गती करणेबाबत धमकाविले जाते. त्यांचा उद्देश कामकाज सुरळीत होणे नसुन हे कामकाजात अडचणी येतील अशाच आहे. कार्यालयातील महिला कर्मचारी त्यानाही तुच्छतेची वागणुक दिली जात असुन वेळी अवेळी त्यांना हजर राहण्याबाबत धमकाविण्याचे प्रकार घडत आहे. तीन व चार ऑगस्ट या दिवशी एस.पी. यानी सर्व महिला कर्मचारी यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी यांना रात्री अकरा वाजेपर्यंत काही अतिमहत्वाचे कामकाज नसतानाही थांबवुन घेतले. यामध्ये एक महिला गरोदर असतानाही त्याची पर्वा त्यानी केली नाही. या कायम तणावात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आता आत्महत्या करण्यासारखे विचार मनात येत असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

ही सर्व परिस्थिती मांडुन त्यावर उपाययोजना करण्याबाबत विनंती कर्मचाऱ्यांनी केली असुन अन्यथा दिर्घ रजेवर जाण्याचाही इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. पोलिस खात्यामध्ये शिस्त असल्याचे सांगितले जात असते पण यामध्ये खात्याच्या प्रमुखावरच कर्मचारी बंड पुकारण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Osmanabad Police staff against SP