
उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखताना आपत्कालिन परिस्थितीत अत्यावश्यक सेवा कोलमडू नये, यासाठी काही शासकीय कामांना सूट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी सोमवारी (ता. १३) याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रस्त्यांची, वीज वितरण कंपनीची कामे मार्गी लागणार आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन संबंधीत कार्यान्वीत यंत्रणेला असणार आहे.
कोरोणा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याने सर्व व्यवहार, उद्योग ठप्प झाले आहेत. त्यात आता तीन मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा
दरम्यान सध्या एप्रिल महिना सुरू आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी जेमतेम दोनच महिन्याचा कालावधी उरला आहे. या दोन महिन्यांत मान्सूनपूर्व कामे करणे अत्यावश्यक असते. अन्यथा पावसाळ्यात शासकीय यंत्रणा कोलमडू शकते. त्यासाठी शासकीय यंत्रणेने सर्व विभागाची अत्यावश्यक कामे करण्यास परवानगी दिली आहे.
सर्व विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांनी कामासाठी लागणारी वाहने, कर्मचारी तसेच अधिकारी यांची नेमणूक करावी. तसेच त्याची प्रत पोलिस प्रशासनाला द्यावी. संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्याने कामाच्या आदेशाची प्रत किंवा ओळखपत्र दाखविणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी संबंधीत कार्यान्वीत यंत्रणेवर असणार आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंग पाळणे, तोंडाला मास्क, रुमाल बांधणे याची काळजी कामगारांना घ्यावी लागणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ही कामे करता येणार
राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा मार्गाची कामे तसेच दुरुस्तीची कामे करता येणार आहेत. नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंतर्गत रस्ते, मल:निस्सारण वाहिन्याचे कामकाज, सांडपाणी व्यवस्था आदी कामांना परवानगी देण्यात आली आहे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, विद्युत विभागातील इतर कामे, भारत संचार निगम लिमिटेड, तसेच इतर दुरसंचार आणि इंटरनेट सेवा आदी प्रकारची कामे, पाणी पुरवठा, जलनिस्सारण वाहिनी आणि स्वच्छतेची कामे करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.