लांबचा पल्ला : कोल्हापूर ते बैतुलचा प्रवास पायीच...

कळंब : कोल्हापूर ते बैतुलदरम्यान प्रवासाला निघालेले मजूर
कळंब : कोल्हापूर ते बैतुलदरम्यान प्रवासाला निघालेले मजूर

कळंब (जि. उस्मानाबाद) : कोरोनाच्या लॉकडाउनमुळे हाल सहन करावे लागत असलेल्या मध्यप्रदेशातील ११ मजुरांनी कोल्हापूरपासून पायपीट सुरू केली असून, तब्बल सातव्या दिवशी, शनिवारी (ता.नऊ) त्यांनी कळंब शहरात पाऊल ठेवले.

तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये ठिकठिकाणी अडकलेल्या परराज्यातील लोकांना राज्य सरकारने परतीचा मार्ग खुला केला; मात्र त्यांना गावापर्यंत पोचवण्याचे नियोजन कोलमडल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे. वाहनांची सोय नसल्याने परराज्यातील अनेक मजूर जीव धोक्यात घालून शेकडो किलोमीटर पायपीट करीत गावाच्या दिशेने निघाल्याचे चित्र कायम आहे. 

मध्यप्रदेश राज्यातील बैतुल जिल्ह्यातील अकरा जण कोल्हापूरला बोअरवेलच्या गाडीवर कामाला होते. लॉकडाउनमुळे दीड महिन्यापासून हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही. गावाकडे जाण्यासाठी सोय नाही. त्यामुळे अकरा जणांनी गाव गाठण्यासाठी कोल्हापूरहून पायपीट सुरू केली. शनिवारी (ता. नऊ)  सकाळी साडेनऊच्या दरम्यान ते येथे दाखल झाले. भूक लागली म्हणून ते भटकत होते. शहरातील काहींनी त्यांना पोटभर जेऊ घातले. त्यानंतर त्यांनी पुढचा प्रवास सुरू केला. 

पाठीवर कपडे व इतर साहित्याचे ओझे, पाण्याच्या बाटल्या, बादल्या घेऊन या अकरा जणांचा सात दिवसांपूर्वी प्रवास सुरू झालाय. आतापर्यंत सुमारे ३०९ किलोमीटर अंतर कापले. गावापर्यंत पोचण्यासाठी त्यांना जवळपास ३९२ किलोमीटर पायपीट करायची आहे. आतापर्यंतच्या पायपिटीत या मजुरांचे पाय सुजले होते. काहींच्या पायाल फोड आल्याचे दिसले. पायावर व्रण पडलेले दिसून येत होते. 

वाटेत लाभली आपुलकी 
महाराष्ट्रातील नागरिकांचे सहकार्य, आपुलकी मिळत आहे. ठिकठिकाणी वाटेत रेशन, बिस्किटे, नाष्टा, जेवण पुरविणारे भेटले. त्यामुळे पायपिटीच्या त्रासातही समाधान मिळत आहे. गावी पोचण्यासाठी आणखी किती दिवस लागतील, पुढचा प्रवास कसा होतो, हे पाहायचे, असे या मजुरांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com