esakal | उस्मानाबादेतील संशयितांच्या स्वॅबची तपासणी आता लातुरात
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी (ता. २८) याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळविले आहे.

उस्मानाबादेतील संशयितांच्या स्वॅबची तपासणी आता लातुरात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यातील कोरोना संशयितांच्या स्वॅबची तपासणी आता लातूर येथील विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे होणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी (ता. २८) याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कळविले आहे.

कोरोना संशयितांच्या स्वॅबची तपासणी करण्यासाठी यापूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील सॅम्पल पुणे येथे पाठविण्यात येत होते. त्यानंतर उस्मानाबादकरांना सोलापूर येथे तपासणी करण्याची सोय करण्यात आली.

दरम्यान मराठवाड्यामध्ये आता औरंगाबाद, नांदेड व लातूर या तीन ठिकाणी तपासणीची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. यामध्ये औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात औरंगाबाद, जालना व बीड, तर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हयाचा समावेश आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील संशयितांच्या स्वबची तपासणी लातुरातील विलासराव देशमुख इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणी होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याला सोलापूर येथे तपासणी करणे सोयीचे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोलापूर येथे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तेथे ये-जा करण्याची गरज आता उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रशासनाला लागणार नाही. शिवाय लातूर आणि उस्मानाबाद हे दोन्ही जिल्हे लहान असल्याने याचाही फायदा होईल असे बोलले जाते. दरम्यान, उदगीर तालुका वगळता आता लातूर जिल्ह्यात अद्यापही बाधितांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे उस्मानाबादकरांना लातूर येथे स्वॅब तपासणी सोपे होणार आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्र परिसरातील तपासणीचा मुद्दा रखडला आहे. उस्मानाबाद विद्यापीठ उपकेंद्रात स्वॅब तपासणी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले होते. काही आमदारांनी यासाठी निधी ही दिला होता. त्यामुळे जिल्ह्यातील संशयितांच्या स्वॅबची तपासणी उस्मानाबादेत होणार अशी आशा होती.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

विशेष म्हणजे परिसरामध्ये मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा असल्याने याबाबत सकारात्मक दर्शविण्यात आली होती. मात्र मंगळवारी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी याबाबत पत्रव्यवहार करीत मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तीन ठिकाणी होणाऱ्या तपासणीबाबत कळविले आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील संशयितांच्या स्वॅबची तपासणी लातूर येथे करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

loading image