esakal | शेतकऱ्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मटका,सट्टा सुरू करण्याची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

 Uddhav Thackarey

शेतकऱ्याची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मटका,सट्टा सुरू करण्याची मागणी

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (जि.उस्मानाबाद) : पंधरा दिवसाभरापूर्वीच राशीला आलेल्या सोयाबीनचे (Soybean) मध्यंतरी झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान झाल्यानंतर प्रशासन पंचनाम्यासाठी येत नसेल तर कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी किमान एक वर्षासाठी गुडगुडी मटका, सट्टा सुरू करण्याची परवानगी देण्याच्या मागणीचे विनंती अर्ज तालुक्यातील कोळसूर (कल्याण) येथील व्यथित शेतकरी अशोक ढगे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Farmer Ashok Dhage Write Letter To CM Uddhav Thackeray) यांच्याकडे सोमवारी (ता.१३) पाठवून केली आहे. मुख्यमंत्र्यांना केलेल्या विनंती अर्जात अशोक ढगे यांनी म्हटले आहे की, कृषीप्रधान देशातील उस्मानाबाद जिल्ह्यात उमरगा (Umarga) हा तालुका कोळसुर (कल्याण) हे  गावातील सर्वे नंबर ३५, ३६, ३८ आणि पाच  यातील तीन एकर शेतीत (Osman अघोटी पेरणी करून उत्तम पीक बहारले होते.

हेही वाचा: उस्मानाबाद जिल्ह्याची औषधविक्री व्यवस्था रामभरोसे?

सद्यःस्थितीत सोयाबीन भाव पाहता अपेक्षित उत्पन्न चार लाख होणार होते. पण अचानक पावसाने सोयाबीन बरबाद झाले. या संदर्भात 'सकाळ'मध्ये बातमी प्रकाशित झाली होती. याला बरेच दिवस उलटून गेले आहेत. दरम्यान खासगी सावकार जगू देत नाहीत, तर बँकांचे कर्जाचे ओझे झोपू देत नाही. गळफासही पण घेता येत नाही. कारण, लहान मुले व आईची जबाबदारी आहे. दरम्यान गुडगुडी, सट्टा मटका व्यवसायाची मला उत्तम जाणीव आहे. शेती व्यवसायाचा हा सट्टा एकतर्फी आहे. पण हा गुडगुडी-सट्टा दोन्हीकडून फायदा देणारा आहे. याची मला जाणीव आहे. त्यामुळे विनंती आहे की, माझ्या शेतातील झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देता येत नसेल, चिखलात येऊन प्रत्यक्ष पंचनामा करण्याची हिंमत होत नसेल तर काही हरकत नाही. पण मला केवळ एका वर्षासाठी उमरगा शहरात गुडगुडी सट्टा, मटका जुगारअड्डा ''विना हप्ता'' सुरू करण्याची रीतसर परवानगी द्यावी, जेणे करून वर्षभरात माझे झालेले नुकसान भरून काढून सर्व कर्ज परतफेड करू शकेन. एक वर्षानंतर हा व्यवसाय दुकान बंद करून पुन्हा शेतीकडे वळेन, असेही श्री. ढगे यांनी निवेदनात नमूद केले आहे. या अर्जाच्या प्रति जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

loading image
go to top