Parbhani News : कालबाह्य रिक्षांमुळे परभणीकारांचा गुदमरतोय श्वास ; शहरामध्ये प्रदूषणाचा स्तर वाढला

हवेतील कार्बनचे प्रमाण सर्वाधिक
parbhani
parbhani sakAL

परभणी : सर्वाधिक प्रदूषित शहरात परभणीचे नाव येण्यास ऑटो रिक्षांसह कालबाह्य झालेली वाहने कारणीभूत ठरत आहे. हवेतील कार्बनचे प्रमाण अधिक असल्याने नांदेडकरांचा श्वास गुदमरत आहे. मात्र, यावर नियंत्रण आणण्यासाठी यंत्रणाच नसल्याने नांदेडकरांमधून संताप होतो आहे.

रिक्षांचे आयुष्य संपल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा रिक्षांचे चेसिज स्क्रॅप केले जाते. स्क्रॅप करणे म्हणजे ही रिक्षा धावण्यायोग्य नाही, याचा तो पुरावा असतो. आरटीओ विभाग स्क्रॅप करण्याची कारवाई करत आहे. मात्र, त्यानंतरही संबंधीत रिक्षा रस्त्यांवर धावणार नाहीत, याची दक्षता मात्र विभागाकडून घेतली जात नाही.

आरटीओने मोडतोड केलेले रिक्षाचे भंगार ऑटोधारक घरी घेऊन जातात आणि त्याचे वेल्डिंग करून ते पुन्हा वापरात आणतात. असे ऑटो रिक्षा पुन्हा रस्त्यावर धावताना दिसून येतात. असे ऑटो रिक्षा पुन्हा आरटीओने पकडलाच तर तो जप्त जरी केला, तरी ऑटोधारकाला त्याचा फरक पडत नाही. आरटीओ विभाग कोणतीही शोधमोहीम राबवत नसल्यामुळे त्यांचे फावले आहे. मात्र, अशा ऑटोच्या धावण्याने परभणी शहराच्या प्रदूषणात भर पडत आहे.

कारवाईसाठी पुढाकार कोण घेणार?

शहरातील कालबाह्य झालेले ऑटो शोधून काढण्यासाठी आरटीओ विभाग पुढाकार घेत नाहीत. ऑटो स्क्रॅप करण्याचे कोणतेही टार्गेट दिले जात नाही. असे ऑटो आलेच, तरच कारवाई केली जाते. मात्र, पुढाकार घेवून स्क्रॅप ऑटो शहरात धावणार नाही, याची दक्षता घेतली जात नाही.

parbhani
Nanded News : नांदेड जिल्ह्यात बदल्यांचे सत्र सुरू

१६ वर्षे जुन्या रिक्षांना प्रतिबंध

शासनाच्या निर्णयाप्रमाणे १६ वर्षाच्या जुन्या रिक्षा सेवेतून बाद ठरवण्यात आल्या आहेत. मात्र, कालबाह्य रिक्षा प्रवाशांची नियमबाह्य वाहतूक करून एकप्रकारे प्रदूषणाला आमंत्रण करत असतात. त्यामुळे या कालबाह्य झालेल्या रिक्षा प्रदूषणात कारणीभूत ठरू नये, हा निर्णयामागचा हेतू आहे. मात्र, या भंगार रिक्षा पुन्हा सेवत येतात.

त्यावर आरटीओकडून कारवाई होणे आवश्यक आहे. असे होते आदेश ज्या ऑटो रिक्षा परवानाधारकांचे परवाने मुदतबाह्य झाले आहेत, अशा परवानाधारकांना नव्याने परवाने प्राप्त करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या लाॅटरी ड्राॅमध्ये अपात्र ठरवण्यात यावे. परवाने नूतनीकरण करता वापरल्या जाणाऱ्या तसेच परवान्याशिवाय अवैधपणे प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाचालकांकडून दंड वसूल करून कारवाई करण्यात यावी.

ई-रिक्षा सर्वोत्तम पर्याय

आपले वाहन चालवण्याच्या स्थितीत आहे की नाही यासंदर्भात रिक्षाचे सर्व कागदपत्रे घेऊन संबंधित व्यक्तीला स्वतःहून आरटीओ कार्यालयात यावे लागते. त्यानंतर ते रिक्षा मोटार वाहन निरीक्षकाकडून तपासले जाते. ते वाहन चालवण्यायोग्य नसेल तर तचे कार्यालयातच तोडले जाते. एकदा तोडलेले वाहन पुन्हा रस्त्यावर धावणार नाही, असे आरटीओचे म्हणणे आहे.

मात्र, दुसरी बाब म्हणजे स्वतःहून कोणी आपले वाहन तोडण्यासाठी आरटीओ कार्यालयात जाईलच कसे, असाही प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कालबाह्य ऑटो रिक्षा नांदेड शहरातील रस्त्यावरून धुराचे लोट सोडत धावत आहेत. यावर पर्याय म्हणजे ई-रिक्षा सर्वोत्तम उपाय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com