हिंगोलीला दुसरा झटका: २२ जवानांसह परिचारिकेला बाधा, आकडा @७६

राजेश दारव्हेकर
Tuesday, 5 May 2020

कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत असून मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाचा आकडा हळूहळू वाढत जात आहे. दोन दिवस एकही रुग्ण नव्हता त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाने दिलासा व्यक्त केला मात्र सोमवारी रात्री उशिरा रुग्णंचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल समोर आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य राखीव दलाच्या २२ जवांनासह एका परिचारिकेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सोमवारी (ता.४) रात्री उशिरा हा अहवाल प्राप्त झाला.

हिंगोली: कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत असून मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातही कोरोनाचा आकडा हळूहळू वाढत जात आहे. दोन दिवस एकही रुग्ण नव्हता त्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाने दिलासा व्यक्त केला मात्र सोमवारी रात्री उशिरा रुग्णंचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल समोर आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य राखीव दलाच्या २२ जवांनासह एका परिचारिकेला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सोमवारी (ता.४) रात्री उशिरा हा अहवाल प्राप्त झाला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मुंबई येथे बंदोबस्ताहून परतलेल्या येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) २२ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ. श्रीनिवास यांनी सोमवारी (ता. चार) रात्री सव्वाबाराच्या सुमारास दिली. बाधित जवानांची संख्या आता ६९ (एक जालन्यातील) झाली आहे. दरम्यान, येथील जिल्हा रुग्णालयातील २४ वर्षीय परिचारिकेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हिंगोलीत आता कोरोनाबाधितांची संख्या ७६ झाली असून, त्यातील एक रुग्ण यापूर्वीच बरा झाला आहे. त्याला घरी जाऊ देण्यात आले आहे.

दोन दिवसात नव्हता एकही बाधित रुग्ण
मागील दोन दिवसात म्हणजेच सोमवारी (ता.४) च्या सायंकाळपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. सोमवारच्या सायंकाळपर्यंत असलेला कोरोना बाधितांचा आकडा ५२ वरुन थेट ७६ वर पोहोचला आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

१४ दिवसानंतरचा पहिला अहवालही पॉझिटिव्ह

हिंगोलीतील आयसोलेशन वार्डमध्ये अगोदरपासूनच भरती असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह एसआरपीएफ जवानाचा १४  दिवसानंतरचा पहिला अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. वरील ६९ एसआरपीएफ जवानांपैकी ३४ जवान हे मालेगाव (जि. नाशिक) येथे कार्यरत होते. तर ३५ जवान मुंबईत कार्यरत होते असेही डॉ. श्रीनिवास यांनी सांगितले. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा पडू नका, घरीच थांबा, सुरक्षित राहा असे आवाहनही डॉ. किशोर प्रसाद यांनी केले आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Two SRPF CoronaVirus Positive Hingoli News