लोकसहभागातून झेडपी शाळेत ई-लर्निंग कक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

मंगरूळ ग्रामस्थांनी जमा केले पन्नास हजार रुपये जमा, विद्यार्थ्यांना हायटेक धडे

माजलगाव - तालुक्‍यातील मंगरूळ जिल्हा परिषद शाळेमध्ये लोकसहभागातून ई- लर्निंग कक्ष सुरू करण्यात आला. त्यासाठी ग्रामस्थांनी ५० हजार रुपयांची वर्गणी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे धडे मिळणार आहेत.  

या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग आहेत. मुख्याध्यापक कल्याण सावध आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष माने यांनी पुढाकार घेत शाळेत ई- लर्निंग कक्ष सुरू करण्याचा निश्‍चय केला. त्यासाठी ग्रामस्थांनी लोकवर्गणी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. त्याला ग्रामस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थांनी २६ हजार रुपये जमा करून दिले; तर मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी दहा हजार रुपये, केंद्रीय मुख्याध्यापकांनी पाच हजार रुपये आणि केंद्रप्रमखांनी पाच हजार रुपयांचा रुपयांची वर्गणी दिली. अशा एकूण ५० हजार रुपयांतून शाळेमध्ये  ई- लर्निंग कक्ष सुरू करण्यात आला. या शिवाय भिंतींची रंगरंगोटी करून त्यावर फुलं, फळे यांची माहिती रेखाटण्यात आली. यासाठी जी. बी. शेळके, नवनाथ राऊत, एस. आर. माहोरे, सरंपच शेख रसूल, माजी सरपंच मोहन घाटूळ, उपसरपंच दीपक बापमारे, किसन घाटूळ यांनी पुढाकार घेतला आहे.

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी शाळेत नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात. त्यातूनच आता ई-लर्निंग सुविधा सुरू करण्यात आली आहे.

- कल्याण सावध, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, मंगरूळ

Web Title: p school e-learning ward by public support