पिवळ्या पाण्यावर आता पीएसी पावडरची मात्रा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

लातूर - गेल्या काही दिवसांपासून शहराला पिवळ्या रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा अहवाल असला तरी महापालिकेकडून आणखी काळजी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात आता पिवळ्या पाण्यावर तुरटीऐवजी पीएसी पावडरची मात्रा दिली जाणार आहे. यातून या पाण्याचा पिवळा रंग कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहराला पिवळ्या रंगाच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी दूषित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे; पण महापालिका दररोज जिल्हा प्रयोगशाळेत या पाण्याची तपासणी करून घेत आहे. त्याचे नमुने पिण्यास योग्य असल्याचा अहवाल प्रयोगशाळा देत आहे. इतकेच नव्हे, तर शनिवारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत व आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी मजगेनगर भागात पाणी सुटण्याच्या वेळी भेट दिली. पाण्याची पाहणी त्यांनी केली. इतकेच नव्हे, तर काही घरांत जाऊन त्यांनी पाणी पिऊनही दाखविले; पण या पाण्याच्या पिवळ्या रंगाचा प्रश्न मात्र अद्यापही कायम आहे. 

लातूरसारखेच कळंब शहरालाही मांजरा धरणातूनच पाण्याचा पुरवठा होत आहे. तेथे नगरपालिकेने पीएसी पावडरचा वापर करून हा पिवळा रंग कमी केला आहे. त्याच पद्धतीने आता महापालिकेच्या वतीने या पिवळ्या पाण्यावर पीएसी पावडरची मात्रा दिली जाणार आहे. यातून हा रंग कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

दरम्यान, रविवारी सुटीचा दिवस असल्याने मांजरा धरणातून पाणी उपसा करण्यात आला नाही; पण हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीचे काम मात्र दिवसभर सुरू राहिले.

Web Title: PAC powder now on the yellow water