पाचोड : विवाहीतेच्या आत्महत्या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा

शेती खरेदीसाठी माहेराहून पन्नास हजार रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
saima sayyad
saima sayyadsakal
Summary

शेती खरेदीसाठी माहेराहून पन्नास हजार रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

पाचोड (जि. औरंगाबाद) - शेती खरेदीसाठी माहेराहून पन्नास हजार रुपये आणण्यासाठी सासरच्या मंडळीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून गेवराई मर्दा (ता.पैठण) येथील तेवीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन मंगळवारी (ता. ३१) केलेल्या आत्महत्ये प्रकरणी पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी मयत विवाहितेच्या भावाच्या तक्रारीवरून पतीसह सहा जणाविरुद्ध बुधवारी (ता.एक) गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. दरम्यान, माहेरच्या नातेवाइकांनी ही आत्महत्या नव्हे, तर घातपात केल्याचा आरोप करीत सासर च्या मंडळीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेवून उतरणीय तपासणीस विरोध केल्याने मंगळवारी (ता. ३१) सायंकाळी काही काळ तणाव निर्माण झाला होता.

मयत विवाहिता सायमा कैसर सय्यद हिचा भाऊ जब्बार गणी शेख रा. भाकरवाडी (ता. बदनापुर, जि. जालना) यांनी पाचोड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सायमा हिचे लग्न गेवराई मर्दा येथील कैसर रशीद सैय्यद याचेशी सन २०२० मध्ये मुस्लिम धर्माच्या रिती रिवाजप्रमाणे झाले. लग्नामध्ये सायमाच्या पतीला दिड लाख रुपये हुंडा दिला होता. लग्नानंतर तिला मुलगी झाली असून ती सध्या आठ महीन्याची आहे.

लग्नानंतर सासरच्या लोकांनी सायमाला तिन चार महीने चांगले नांदविले, त्यानंतर तिला कैंसर रशीद सैय्यद (पती), रशीद रसुल सैय्यद (सासरा), फैय्युमनाबी रशीद सैय्यद (सासु), अन्सार रशीद सैय्यद (दिर), फातेमा अन्सार सैय्यद (जावू), परवीन रशीद सैय्यद (नंणंद) सर्व रा. गेवराई गर्दा (ता. पैठण) हे सायमा हिला लग्नामध्ये तुझ्या आई-वडील भाऊ यांनी भांडे व हुंडा कमी दिला असे म्हणुन तिला शाररिक व मानसीक त्रास देवु लागले. तिला व आई-वडीलांकडुन शेती घेण्यासाठी पन्नास हजार रुपये घेवुन ये म्हणुन तिचा छळ करू लागले. ती सासरच्या त्रासाला वैतागून नांदण्यास न जाण्यासंबंधी सांगु लागली. मात्र, तिची समजूत घालुन तिला अफसर शब्बीर शेख (रा. राजणगांव दांडगा) यांचे मध्यस्थीने सासरी गेवराई मर्दा येथे पाठवीले. ईदच्या दुस-या दिवशी सायमाचा तिला नवरा कैंसर सैय्यद आला होता. त्यावेळी त्याने आमच्याकडे शेती घेण्यासाठी पन्नास हजार रुपयाचे मागणी केली. परंतु, आमच्याकडे पैसे नसल्या कारणामुळे आम्ही त्यास आमच्याकडे पैसे आल्यावर देऊ असे सांगुन त्याची समजुत काढुन पाठवीले होते.

मंगळवारी (ता. ३१) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास सायमाचा पती कैसर सैय्यद याने फोन करून 'सायमा हिला घेवुन जा, व शेती घेण्यासाठी तिच्यासोबत पन्नास हजार रुपये द्या, नाहीतर तिला परत पाठवु नका, असे फोनवर सांगीतले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सायमा हिने सासरच्या लोकांचा शारीरिक व मानसीक छळ असह्य झाल्याने त्यांच्या त्रासाला कंटाळुन त्यांचे शेतातील विहीरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली. असून याच्या आत्महत्येस नवरा-कैंसर, सासरा-रशीद, सासु-फैय्युमनाबी, दिर-अन्सार, जावु-फातेमा, नणंद-परवीन हेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

या तक्रारीन्वये पाचोड पोलिसांनी उपरोक्त सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली बुधवारी (ता. एक) गुन्हा दाखल करून पती, सासरा व नणंद या तिघांना अटक केली.

बुधवारी (ता. एक) सकाळी पाचोड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मृत सायमावर सासरी अंत्यविधी न करता तिच्या नातेवाईकांनी तिचा माहेरी भाकरवाडी ता. बदनापूर येथे दफनविधी केला. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या पोलिस नाईक प्रशांत नांदवे, पवन चव्हाण करीत आहे.

आई सायमा व कुटुंबियाच्या भांडणात आठ महिन्याच्या चिमुकलीचा काय बरे दोष...? तिला समजण्या अगोदरच तिचे मायेचे छत्र हरपले, चिमुकलीच्या नशिबी आता पोरकेपणा येऊन आई स्वर्गवासी तर पिता कारागृहात गेले. आता मायेचे छत्र हरपल्याने ति अवघी आठव्या महिन्यातच पोरकी झाली. हे वृत्त जेव्हा समजले, तेव्हा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com