ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेला निधीची प्रतीक्षा

चंद्रकांत तारू
रविवार, 30 जुलै 2017

पैठण - येथील थेट जायकवाडी धरणातून होत असलेल्या ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक हे पैठण येथे रविवारी (ता. ३०) येत आहेत. प्रगतिपथावर असताना, निधीअभावी बंद पडलेल्या, शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या या योजनेला मुख्य सचिवांच्या पाहणी दौऱ्यात निधीची संजीवनी मिळावी, अशी आशा लाभधारक शेतकरी व्यक्त करीत आहेत. योजनेचे काम सुरु झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने एकूण ११६ कोटी रुपये निधी गेल्या दहा वर्षांच्या काळात मिळाला. हा संपूर्ण निधी आता खर्च झाला आहे.

नवीन आलेल्या भाजप-शिवसेना सरकारच्या काळात एक रुपयाही आतापर्यंत मिळाला नसून, या सरकारचा काळही उलटत चालला आहे. दोनशे बावीस कोटींच्या योजनेला सर्वच पातळीवर दुर्लक्षित केल्यामुळे झालेल्या विलंबाचा मोठा आर्थिक फटका शासनाला बसला आहे. आज ५२१ कोटी रुपये खर्चाची ही योजना झाली असून, हा खर्च भविष्यात करावा लागणार आहे. आता या खर्चात काम पूर्ण केले नाही तर पुन्हा कोटीची भर वाढतच जाणार असल्यामुळे शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निधीअभावी प्रगतिपथावर असलेल्या योजनेच्या सर्व कामांना खीळ बसली आहे. प्रथम टप्प्यातील कामेही अर्धवट झाली आहेत. पुढील कामे करण्यासाठी शासन कधी निधी देते याची प्रतीक्षा आहे. योजना कार्यान्वित झाल्यानंतर शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. तालुक्‍यात सर्वात मोठा निधी खर्च होणारा हा एकमेव महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पाचे काम सुरु झाले तेव्हा २२२ कोटी रुपयांचा निधी लागणार होता; परंतु निधीचे काम रखडले आणि योजनाही रखडत गेली, अशी अवस्था आज निधी नसल्यामुळे पाहायला मिळत आहे. 

मुख्य सचिवांच्या दौऱ्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष
महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव यांचा जिल्ह्यात फक्त पैठणला दौरा असून, या दौऱ्यामध्ये जायकवाडी धरण येथील ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेला भेट देऊन पाहणी केली जाणार आहे. या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी मुख्य सचिवांनी विशेष लक्ष घालून निधी द्यावा, अशी तालुक्‍यातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

Web Title: paithan news fund marathwada