

UPSC CAPF Success Vishwas Jhargad From Paithan Gets Rank 145 With Family Support and His Mothers Photo
esakal
-चंद्रकांत तारु
पैठण : बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले, मात्र आजोबा, काका, मामा आणि दोन मोठ्या बहिणींनी दिलेल्या प्रेमाच्या आणि आधाराच्या बळावर पैठणच्या विश्वास विजय झारगड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या(यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलिस दल (सीएपीएफ) सहायक समादेशक (असिस्टंट कमांडंट) या पदावर १४५ क्रमांकाने यश संपादन केले आहे.त्यांच्या या यशामुळे पैठण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, राष्ट्रीय स्तरावरील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विश्वास यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.तसेच या यशामुळे पैठणच्या युवकांसमोर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठे ध्येय गाठण्याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.