Pancreatic Cancer: कर्करोगाच्या गाठीने पित्तवाहिनी दाबली; अत्याधुनिक उपचाराने ५५ वर्षीय रुग्णाची काविळीतून सुटका, डॉक्टरांनी ईयूएसने शोधला नवा मार्ग!

EUS Treatment Gives New Hope To Pancreatic Cancer Patient: स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे पित्तवाहिनी पूर्णपणे बंद; ईयूएस तंत्रज्ञानातून मेटल स्टेंट बसवून पित्ताचा निचरा सुरू, कावीळ-तीव्र वेदनांतून दिलासा
Pancreatic Cancer Patient Gets Relief From Jaundice After EUS Guided Bile Drainage At Chhatrapati Sambhajinagar

Pancreatic Cancer Patient Gets Relief From Jaundice After EUS Guided Bile Drainage At Chhatrapati Sambhajinagar

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर : स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याने पित्त वाहून नेणारी नळी दाबली जाऊन पित्ताचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे रुग्णाला कावीळ, गडद रंगाची लघवी आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सहन करावा लागत होता. यामुळे कर्करोगाच्या उपचारातही अडथळे येत होते. अशा कठीण परिस्थितीत मेडिकव्हर रुग्णालयाने अत्याधुनिक एंडोस्कोपीच्या मदतीने यशस्वी उपचार करत रुग्णाची त्रासातून सुटका केली, अशी माहिती डॉ. चेतन राठी यांनी गुरुवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com