पंकजा मुंडेकडून मुंडे-मेटेंना कोपरखळी, तर शिवसेनेला शुभेच्छा

दत्ता देशमुख
मंगळवार, 15 जानेवारी 2019

- जयलुक्तबाबत विरोधकांची टिका अभ्यास शुन्य
- पंकजा मुंडे यांची टिका
- जिल्ह्यात निधीचा पाऊस

बीड : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे उपस्थित नव्हते, यावर राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, विरोधी पक्षनेते केवळ विधान परिषदेत भाषणे करतात. एकाही जिल्हा नियोजन समिती बैठकीत त्यांनी उपस्थिती लाऊन प्रश्न मांडले नाहीत. राजकारण सोडून जिल्ह्याच्या प्रश्नांना त्यांनी वेळ द्यावा. तर, मेटेंबाबत ‘तो त्यांच्या सेन्सॅरिटीचा प्रश्न आहे’ अशा दोघांना कोपरखिळी लगावल्या. तर, जिल्ह्यातील शिवसेनेचा दुष्काळ संपविण्याच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आवाहनाबाबत ‘त्यांना शुभेच्छा आहेत’, राष्ट्रवादी कमी होऊन जिल्ह्यात शिवसेना वाढली तर हरकत नाही. मात्र, भाजप कमी होणार नाही. 

जयलुक्तबाबत विरोधकांची टिका अभ्यास शुन्य
जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळेच मागचे चार वर्षे टंचाई जाणवली नाही, पाण्यासाठी टँकर लागले नाहीत. यंदा निसर्गानेच अवकृपा केली त्यामुळे टंचाई जाणवत आहे. जलयुक्त बाबत विरोधकांची टीका अभ्यासशुन्य असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. 

मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता.15) जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंडे म्हणाल्या, चारा छावण्यांचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. जिल्ह्याच्या टंचाईबाबत ता. 25 डिसेंबरला स्वतंत्र बैठक घेतली जाईल. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीमध्ये 2019-20 या आर्थिक वर्षाच्या 327 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. खासदार डॉ. प्रितम मुंडे, जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह उपस्थित होते. 

जिल्ह्यात निधीचा पाऊस
प्रत्येक क्षेत्रासाठी जिल्ह्याला भरीव निधी आणला आहे. शे-दोनशे कोटींशिवाय गोष्ट होत नाही. अगदी निधीचा जिल्ह्यात पाऊस पाडल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. दहा-पाच कोटी रुपये चिल्लर आकडे वाटतात असेही मुंडे म्हणाल्या.

Web Title: Pankaj Munde Criticises on Munde Mete and wishes to Shiv Sena