काही दिवसच शिल्लक राहिलेत, लवकर खरेदी करा Heroच्या बाईक्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hero Splendor
काही दिवसच शिल्लक राहिलेत, लवकर खरेदी करा Heroच्या बाईक्स

काही दिवसच शिल्लक राहिलेत, लवकर खरेदी करा Heroच्या बाईक्स

जर तुम्ही Hero MotoCorpची स्प्लेंडर किंवा पॅशनसारखी कोणतीही मोटारसायकल खरेदी करण्याचा प्लॅन करताय का? ती स्वस्तात खरेदी करण्यासाठी आता केवळ काही दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर कंपनी आपली मोटारसायकल आणि स्कूटर या सर्वांच्या किंमती वाढवणार आहे.

चार जानेवारीपासून हिरोच्या गाड्या महागणार

देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero MotoCorp ४ जानेवारीपासून आपल्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या किंमती वाढवणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार उत्पादन किंमतीत मोठी वाढ झाली आहे. अशा स्थितीत काही भार ग्राहकांवर टाकणे आवश्यक झाले आहे. (Hero Motocorp Price Hike Up 2000 RS of scooter motorcycle from new year)

हेही वाचा: Suzuki Burgman Street स्कूटर खरेदी करा १० हजारात

२००० पर्यंत वाढणार किंमती

Hero Moto Corp आपल्या वाहनांच्या किंमती ४ जानेवारपासून २००० रुपयापर्यंत वाढणार आहे. ते वाहनांचे माॅडेल आणि व्हेरिएंटवर अवलंबून असेल. हिरो स्प्लेंडर (Hero Splendor) देशात सर्वाधिक विकली जाणारी मोटारसायकल आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये देशभरात तिची १.९२ लाख युनिट विक्री झाली आहे. दुसरीकडे हिरोची एचएफ डिलक्स (Hero HF Deluxe) देशातील सर्वात स्वस्त बाईक्सपैकी एक आहे. तिची किंमत जवळपास ५० हजारांपासून सुरु होते. अद्याप कंपनीने स्पष्ट केलेले नाही. त्यांच्या किंमतीत कितीने वाढ किंवा होईल की नाही.

या कंपन्यांनी ही वाढवल्या किंमती

हिरो कंपनी व्यतिरिक्त Maruti Suzukiआणि Tata Motors या कंपन्यांनी ही जानेवारपासून वाहनांच्या किंमती वाढण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Hero Motocorp Price Hike Up 2000 Rs Of Scooter Motorcycle From New Year

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top