म्हणे, पंकजा आजारी. पण खडसेंबद्दलही नो कमेंटस्‌

प्रकाश बनकर
Monday, 9 December 2019

सकाळी दहा वाजेपासून बैठक सुरु झाली. मात्र बैठकीस प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांपासून कार्यकारिणी अध्यक्षांनी हजेरी लावली. या बैठकीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र पाठ फिरवली. पंकजा न आल्यामुळे त्यांचे काही समर्थकही बैठकीकडे फिरकले नसल्याचे दिसून आले.

औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांसंदर्भात राज्यभरातील विभागनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत. सोमवारी (ता.9) औरंगाबाद विभागात बैठक घेण्यात आली. या बैठकीस पंकजा मुंडे, संभाजी पाटील निलंगेकर सोडता मराठवाड्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पंकजा न आल्यामुळे सर्वत्र त्यांच्या नाराजीविषयीच्या चर्चेला उधाण आले. 

भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह गेल्या दोन आठवड्यांपासून चर्चिला जात आहे. पंकजा मुंडे यांनी निवडणुकीतील पराभवानंतर फेसबुक पेजवर एक भावनिक पोस्ट टाकत खळबळ उडावून दिली. 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर त्या आपल्या पुढील वाटचालीविषयी मेळाव्यात बोलणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांची पक्षाविषयी असलेली नाराजी आज बैठकीला न आल्याने पुन्हा उघड झाल्याचे अनेकजण म्हणत आहेत. पण चंद्रकांत पाटील वेगळेच काही सांगत आहेत.

भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी औरंगाबादच्या जिल्हा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय बैठक घेण्यात आली. या बैठकीस माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, माजी राज्यमंत्री अतुल सावे, सजितसिंह ठाकुर यांच्यासह मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले - मराठा समाजाच्या हिताचे निर्णय का रद्द करताय?

माध्यमांनी पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याविषयी विचारल्यानंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी पंकजा मुंडे आजारी असल्यामुळे बैठकीला येऊ शकल्या नाहीत, असे सांगत वेळ मारून नेली. मात्र, एकनाथ खडसे यांच्याविषयी नो कमेंटस म्हणत तो विषय टाळला.

सकाळी दहा वाजेपासून बैठक सुरु झाली. मात्र बैठकीस प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांपासून कार्यकारिणी अध्यक्षांनी हजेरी लावली. या बैठकीकडे पंकजा मुंडे यांनी मात्र पाठ फिरवली. पंकजा न आल्यामुळे त्यांचे काही समर्थकही बैठकीकडे फिरकले नसल्याचे दिसून आले. याविषयी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, ''पंकजा मुंडे यांनी प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले आहे. तसेच 12 डिसेंबरला स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनी गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याच्या तयारीमुळेही त्या बैठकीस येऊ शकल्या नाहीत. याबद्दल त्यांनी आम्हाला आधीच कळवले होते,'' 

हिंमत असेल, तर आमच्याशी पंगा घ्या म्हणाले चंद्रकांत पाटील

पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणामुळे नाराज असलेले एकनाथ खडसे हे दिल्लीत केंद्रीय कार्यकारिणीकडे आपली नाराजी व्यक्‍त करणार आहेत. या विषयी माध्यमांनी विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ''याविषयी मला माहित नाही. तुम्हाला सगळेच माहिती आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pankaja Munde ill, No Comments About Eknath Khadse in Aurangabad