अन्‌ पंकजा मुंडे यांचे  हेलिकॉप्टर उडालेच नाही 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

औरंगाबाद - शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चांगलाच वाढला आहे. भाजपने तर मराठवाड्यात प्रदेशाध्यक्षांपासून झाडून सगळ्याच मंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका लावला आहे. कमी वेळात जास्त सभा घेता याव्यात, यासाठी पक्षाकडून नेत्यांना हेलिकॉप्टरदेखील पुरवण्यात आले. आता हेलिकॉप्टरनेच दगा दिला, तर नेत्यांनी काय करावे? असाच काहीसा प्रकार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबतीत घडला. नियोजनानुसार रविवारी पंकजा मुंडे यांच्या औरंगाबाद व नगर जिल्ह्यात प्रचार सभा होणार होत्या.

औरंगाबाद - शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चांगलाच वाढला आहे. भाजपने तर मराठवाड्यात प्रदेशाध्यक्षांपासून झाडून सगळ्याच मंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका लावला आहे. कमी वेळात जास्त सभा घेता याव्यात, यासाठी पक्षाकडून नेत्यांना हेलिकॉप्टरदेखील पुरवण्यात आले. आता हेलिकॉप्टरनेच दगा दिला, तर नेत्यांनी काय करावे? असाच काहीसा प्रकार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या बाबतीत घडला. नियोजनानुसार रविवारी पंकजा मुंडे यांच्या औरंगाबाद व नगर जिल्ह्यात प्रचार सभा होणार होत्या. परळी मुक्कामी असलेल्या पंकजा मुंडे या सकाळी औरंगाबादकडे जाण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये बसल्या खऱ्या; पण ते काही केल्या उडालेच नाही. पायलटने बराच वेळ प्रयत्न करूनही हेलिकॉप्टर हवेत उडण्यास तयार नसल्याचे लक्षात येताच मग रविवारच्या सर्व नियोजित सभा रद्द करण्यात आल्याचे निरोप ठिकठिकाणी येऊन धडकले.

Web Title: pankaja munde meeting canceled